Home Breaking News *नगर मनमाड रस्त्याची भयानक दुरावस्था;निष्पाप जीवांचा जातोय बळी!*

*नगर मनमाड रस्त्याची भयानक दुरावस्था;निष्पाप जीवांचा जातोय बळी!*

277
0

*नगर मनमाड रस्त्याची भयानक दुरावस्था;निष्पाप जीवांचा जातोय बळी!* अहमदनगर, ( प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- चालू वर्षीचा पावसाळा हा मागील वर्ष्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे, सलग दोन दिवसपासून संततधार अतिवृष्टी व मागील जुलै ,ऑगस्ट महिन्यात देखील अति पावसाचे प्रमाण त्या मुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान तर झालेच ,आणि त्याही पेक्षा मह्त्वाची आणि अति गंभीर बाब म्हणजे या वरूण राजानें रस्ते सुद्धा सोडले नाहीत ,नगर मनमाड रस्त्यावर तर मोठं मोठे खड्डे पडले आहेत, आणि त्या खड्यात साठलेले पावसाचे पाणी ,त्या मुळे रस्त्याचा अंदाज येत नाही ,प्रवाश्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते,परंतु हा रस्त्यातील आ वासून उभा असलेला जलमय खड्यारुपी यमदूत या निष्पाप प्रवाश्यांचा बळी घेतल्या शिवाय राहत नाही,नाहक बळी जातो,शासन असल्या किती निष्पाप जीवांचा बळी जाण्याची वाट पाहणार आहे, वरूण राज्याचे आपल्या हातात नाही, परंतु खड्डे बुजवून निष्पाप जीवांचा बळी जाणाऱ्या जीवांचा पावसामुळे रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून जीव वाचवणे हे संबंधित खात्याचे काम नाही का, प्रवाशी हा कोणत्या ना कोणत्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असतो,शक्यतो , आपल्या चिल्या पील्यांच्या चिमन चाऱ्याच्या शोधात तो बाहेर पडतो, रस्त्यावरील खड्डे मात्र गरीब श्रीमंत असा भेद करीत नाही, खड्यांपुढे सर्व समान असतात, थोडक्यात : ” सौंसार केला कोटीन कोटी, मेल्यावर मात्र संग येईना लंगोटी’: अशी अवस्था या नगर मनमाड रस्त्यावरील राक्षस रुपी खड्या मुळे प्रवाश्यांची होत आहे, म्हणून महाराष्ट शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ,” ताकाला जाऊन गाडगे लपविण्यापेक्षा त्वरित खडे बुजून या निष्पाप प्रवाश्यां ना जीवदान देऊन दुवा घ्यावा ,अशी पोट तिडकीची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Previous article🛑 कांदा पुन्हा भडकला 🛑
Next article*पुण्श्लोक अहिल्यादेवीच्या चोंडीतल्या पुलावरुन पाणी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here