• Home
  • 🛑 कांदा पुन्हा भडकला 🛑

🛑 कांदा पुन्हा भडकला 🛑

🛑 कांदा पुन्हा भडकला 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्यूरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे ⭕ – पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. जुन्या कांद्याची प्रतही काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत राज्यासह परराज्यातून मागणी वाढल्याने घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचा भाव 270 ते 340 रूपयांवर पोहचला आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा किलोमागे सुमारे 90 रूपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कांद्याचा भाव 40 ते 50 रूपयांवर पोहचला आहे. जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड कांदा-बटाटा विभागात गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी होत आहे.

रविवारी केवळ 50 ट्रक आवक झाल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले. यंदा पावसामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी कांदा उत्पादक क्षेत्रात नविन लागवड केलेले कांद्याचे पीक वाया गेले आहे. सुमारे 50 टक्के नुकसान झाले आहे. शेतकरी जुना कांद्याची साठवणूक करतात. मात्र, मागील काही महिन्यांत प्रचंड उण आणि अचानक पाऊस अशा लहरी वातावरणामुळे साठवणुकीतील निम्मा कांदा खराब झाला आहे.

पावसामुळे उपलब्ध नविन आणि जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात दाखल होत असलेल्या कांद्यामध्ये हलक्या आणि खराब दर्जाच्या कांद्याचे प्रमाण जास्त आहे.

त्या तुलनेत मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. पुढील काही दिवस कांद्याचे भाव तेजीत राहतील असा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment