राजेंद्र पाटील राऊत
घेऊनी राजदंड हाती
सिंहांसनाधिश्वर शिवछत्रपती
भोर वासियांकडून पानिपत मध्ये होणार शिवछत्रपतीचा पुतळा स्थापन..! भोर,(महेश भेलके पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारताच्या इतिहासात पाहिल्यांदा घटणारी ही घटना होय शिवभूमी भोर मावळ प्रांत याच प्रांतातून ज्या ठिकाणी मराठांच रक्त सांडलं जिथं लढाई हरून सुद्धा मराठ्यांचा उद्धार आजही अभिमानाने होत आहे अशा पानिपत (हरियाणा)मध्ये अखंड हिंदुस्थानाचे दैवत आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्त बसवण्यात येणार आहे ,आज सोमवार दिनांक 20 रोजी या महाराजांच्या मूर्ती ची भोर शहरातुन सवाद्य आनि समस्त शिव भक्तांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली उद्या ही मूर्त पानिपत कडे रवाना होणार आणि काही दिवसात भोर मधून अनेक शिवभक्त त्याठिकाणी जाणार ही भोर वासीयांसाठी एक आनंदाची पर्वणी असेल यामध्ये तिळमात्र शंका नाही,
सदर मोहिमेसाठी भोर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच तमाम शिवभक्त यांचे योगदानाने संपन्न होत आहे