• Home
  • सलमानच्या फार्महाऊसवर ‘निसर्गा’चा प्रकोप

सलमानच्या फार्महाऊसवर ‘निसर्गा’चा प्रकोप

🛑 सलमानच्या फार्महाऊसवर ‘निसर्गा’चा प्रकोप 🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड आणि आणि रत्नागिरी जिल्ह्यात दिसू लागला आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर घरावरील पत्रे उडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पेण, इंदापूर, माणगाव, रोहा, कोलाड, मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, रत्नागिरी तसेच इतर किनारी भागांत वादळाचे तीव्र पडसाद उमटल्याने मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसला चक्रीवादळाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे तो कुटुंबासोबत पनवेलमधील फार्म हाऊसमध्येच आडकला आहे.
या फार्महाऊसमध्ये सलमानसोबत लुलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिस, आयुष शर्मा आणि सलमानचा भाचा असे अनेकजण राहत आहेत. या काळात निसर्ग चक्रीवादळामुळे फार्म हाऊसचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरने सोशल मीडिया पोस्ट केले आहेत.
लुलियाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान फार्महाऊसची साफसफाई करताना दिसत आहे. साफसफाईच्या कामात लुलिया देखील त्याची मदत करताना दिसत आहे. शिवाय सलमानचे इतर सहकारी देखील व्हिडिओमध्ये फार्महाऊस स्वच्छ करताना दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment