• Home
  • आर्थिक अडचणीतून सलूनचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

आर्थिक अडचणीतून सलूनचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

🛑 आर्थिक अडचणीतून सलूनचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न 🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सर्वच ठिकाणची सलून बंद ठेवण्यात आली आहेत. त्यातूनच हाताला काम व पैसा नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका सूलनचालकाने कात्री स्वतःच्या पोटात खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रूग्णालयात?उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. जयराम गायकवाड असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सलूनचालकाचे नाव?आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात?आल्यानंतर मगील अडीच महिन्यांपासून सर्वच ठिकाणी असलेली सलून बंद आहेत. त्यामुळे सलूनचालक व मालकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. जयराम यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते नैराश्यात होते. जयराम हे मंगळवारी सकाळी घराबाहेर पडले आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन सलूनमधील कैचीने स्वतःच्या पोटावर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना कळवले. जयराम गंभीर अवस्थेत स्वच्छतागृहात आढळून आल्यानंतर पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली. मात्र, बराच वेळ होऊनही रुग्णवाहिका पोहोचली नाही. अखेर पोलिसांनी मोबाइल व्हॅनमधूनच त्याला रुग्णालयात नेले. सलून बंद असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

त्यातून, जयराम बर्‍याच दिवसांपासून तणावात होता. कुठूनही मदत मिळत नव्हती. त्यामुळं त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment