• Home
  • पूना हॉस्पिटलला नोटीस

पूना हॉस्पिटलला नोटीस

🛑पूना हॉस्पिटलला नोटीस🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोना संशयित रुग्णांना दाखल करुन घेण्यास आणि उपचारास नकार दिल्याने पुना हॉस्पिटलला महापालिकेने नोटीस बजावली असून हे कृत्य बेजबाबदारपणाने व वैद्यकीय पेशाला लाजविणारे असल्याचे सडेतोड मत नोटीसीमध्ये नोंदविण्यात आले आहे. या घटनेचा खुलासा 24 तासांच्या आत करावा अन्यथा कारवाई करण्याचा इशाराच पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

कोरोनाग्रस्तांना तात्काळ दाखल करुन घेत त्यांच्यावर उपचार करण्याचे आवाहन पालिकेने वारंवार खासगी रुग्णालयांना केले आहे. काही रुग्णालये मात्र पालिकेच्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी पालिकेने रुबी हॉल रुग्णालयालाही नोटीस बजावली होती. पालिकेच्या अधिकार्‍यांनी मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड येथील 60 वर्षीय पुरुष आणि पर्वती पायथा येथील 75 वर्षीय महिलेला पुना हॉस्पिटलने दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. हे दोघेही गुरुवारी पुना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल होण्याकरिता गेले होते. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबोळकर यांनी या रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात दाखल होण्याबाबत सांगितले. तसेच उपचारास नकार दिला. त्यानंतर हे रुग्ण ऑटो रिक्षाने धनकवडी येथील भारती हॉस्पिटलमध्ये गेले. यासंदर्भात पालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

या दोन्ही रुग्णांची वैद्यकीय तपासणी करुन घेणे, त्यांना योग्य ती औषधे देणे, त्यांना आयसीयुमध्ये ठेवणे अपेक्षित होते. तसेच त्यांच्या आजाराचे गांभिर्य पाहून उपचार करणे आवश्यक होते. आयसीयू बेड उपलब्ध नसतील तर कोणत्या रुग्णालयात ते उपलब्ध आहेत याची माहिती घेऊन अद्ययावत रुग्णवाहिकेमधून तिकडे पाठविणे अपेक्षित होते. परंतू, रुग्णालय प्रशासनाने अतिशय हलगर्जीपणा दाखवित रुग्णांची हेळसांड केली. हे कृत्य बेजबाबदारपणाचे आणि वैद्यकीय पेशाला लाजविणारे असल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment