आशाताई बच्छाव
नांदेड शहरातील गणेश विसर्जन सोहळ्या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करा –
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड प्रतिनिधि
लाडक्या बाप्पाला श्री गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सवाद्य मिरवणूक काढतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी नांदेड शहरात गणेश मिरवणुकी दरम्यान नागरिकांनी ठरवून दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
गणेश विसर्जन दि. २८ रोजी गुरुवारी होत आहे. या दरम्यान शहरात कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेदरम्यान बरेच रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. त्याला पर्याय म्हणून पोलीस विभागाने पर्यायी रस्ते सुचवलेले आहेत. प्रवासाचा मार्ग ठरवतांना बंद असलेल्या रस्त्यांचा विचार करून आपला प्रवास मार्ग निश्चित करावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
श्री गणेशांचे विसर्जनासाठी नांदेड पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून काही रस्ते श्री विसर्जन होईपर्यंत बंद केले आहेत. आणि त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग सुध्दा सुचवले आहेत.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग….
जुना मोंढा-देना बँक – महाविर चौक-तरोडेकर मार्केट – वजिराबाद चौक-कललामंदिर-शिवाजीनगर ते आयटीआय चौक जाण्या-येण्याचे दोन्ही मार्ग बंद असतील.
राजकॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राज कॉर्नर-वर्कशॉप टी पॉईंट-श्रीनगर ते आयटीआयपर्यंत डावी बाजू बंद राहिल. राजकॉर्नर ते तरोडानाकाकडे जाणारी वाहतुक डाव्या बाजूने बंद राहिल.
हडको-सिडको ते जुना मोंढाकडे येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग….
चौककडून श्रीनगर-वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक पोलीस मुख्यालय – लालवाडी अंडरब्रिज – शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वायपॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल.
राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतुक राजकॉर्नर-वर्कशॉप कॉर्नर- भाग्यनगर-आनंदनगर-नागार्जुना टी पॉईंट अण्णाभाऊ साठे चौक- यात्रीनिवास पोलीस चौकी – अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल. गोवर्धनघाट पुलावरून नांदेड शहरात येणा वाहतुक तिरंगा चौक पोलीस मुख्यालय कॉर्नर-लालवाडी अंडरब्रिज- पिवळी गिरणी ते गणेशनगर वॉयपॉईंट जाण्या-येण्यासाठी वापरात आहे. हडको-सिडकोकडून नांदेड शहरात येणारी वाहतुक साई कमान-कौठा पोलीस चौकी – रविनगर-गोवर्धनघाट नवीन पुल-तिरंगा चौक पोलीस मुख्यालय-लालवाडी अंडरब्रिज – गणेशनगर वॉयपॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल
असे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.






