Home नांदेड सराईत गुन्हेगारास गोळीबार करून एलसीबीने घेतले ताब्यात

सराईत गुन्हेगारास गोळीबार करून एलसीबीने घेतले ताब्यात

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0080.jpg

सराईत गुन्हेगारास गोळीबार करून एलसीबीने घेतले ताब्यात
नांदेड मधील घटना
नांदेड प्रतिनिधि

मागील अनेक कालावधी पासून विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेला गुन्हेगार हा गत कांहीं काळापासून पोलिसांना हवा होता. मात्र सातत्याने तो पोलिसांना चकवा देत होता.

पोलिसांना सदर आरोपी शहरातील एका शाळा परिसरात आल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून पळून जाणाऱ्या आरोपीस पायावर गोळी मारून ताब्यात घेतले. त्याच्यावर नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अबु शुटर उर्फ आवेज शेख मेहमुद हा गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला कॅनॉल रोडजवळ दिसला. पोलीसांनी त्याला थांबण्याची सुचना केली. तेंव्हा त्याने आपल्या कंबरेला लावलेला खंजीर काढून चक्क पोलीसांनाच धमकावले.

तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे प्रमुख पांडूरंग माने यांनी अबु शुटरवर गोळी चालवली. ती गोळी त्यांच्या मांडीत लागली.

तरी तो तशाही अवस्थेत पळत असताना पोलीस पथक त्याचा पाठलाग करत होते. दरम्यान शहरातील एका शाळेजवळ आल्यानंतर मात्र तो खाली कोसळला असता पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले.

सदरील घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी जखमी आरोपी अबु शुटर यास उपचारासाठी विष्णुपुरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहिपर्यंत सदर घटने प्रकरणी कायदेशीर कार्यवाही ची प्रक्रिया सुरू होती.
आरोपी अबु शुटरविरुध्द नांदेड ग्रामीण, इतवारा पोलीस ठाण्यासह कर्नाटक राज्यात देखील गुन्हा नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here