Home सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयातील खंडू रेंगडे 2500 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात 

भूमी अभिलेख कार्यालयातील खंडू रेंगडे 2500 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात 

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0090.jpg

भूमी अभिलेख कार्यालयातील खंडू रेंगडे 2500 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात   युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

करमाळा –

जमिनीची मोजणी करून हद्द कायम करून त्याचा नकाशा प्रिंट देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती अडीच हजार घेणाऱ्या पर्यरक्षण भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधात विभागाने रंगेहात पकडले आहे. खंडू मारुती रेंगडे, वय-४७ वर्षे, पद-परिरक्षण भूमापक, (वर्ग-३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय करमाळा असे लाच घेताना रंगीहात पकडण्यात आलेल्या भूमापकाचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे मौजे मोरवड येथील गट नं.११ चा ९१/१ मधील १ हेक्टर ३१ आर जमीनीची मोजणे होऊन त्याबाबतच्या हद्दी कायम करुन नकाशाची प्रिंट मिळणेबाबत दि.१७.०१.२०२२ रोजी तातडीचा अर्ज देवून त्याबाबतची शासकिय ३०००/- रुपये चलनाव्दारे भरली होती. यातील तक्रारदार यांनी शासकिय फि चलनाव्दारे भरलेली असताना देखील यातील आलोसे रेंगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मोजणी करुन हद कायमचा नकाशा प्रिंट काढणेकामी व इतर कागदपत्रे तयार करण्यास लागणाऱ्या खर्चासाठी तक्रारदार यांच्याकडे ३०००/- रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अॅन्टी करप्शन ब्यूरो सोलापूर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि.२५.०९.२०२३ रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक खंडू रेंगडे यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नावे असलेल्या शेत जमीनीची मोजणी करुन त्याबाबतचा हद कायमचा नकाशााची प्रिंट व इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३०००/- रू. लाचेची मागणी करुन तडजोडी अंती २५००/- रुपये लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यावरून करमाळा पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर च्या पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार- पोह प्रमोद पकाले, पोकों गजानन किणगी, चापोकों शाम सुरवसे यांचे पथकाने केली.

Previous articleजिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समन्वयामुळे वैराग येथील मोजणी पूर्ण
Next articleसराईत गुन्हेगारास गोळीबार करून एलसीबीने घेतले ताब्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here