Home गडचिरोली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर

71
0

आशाताई बच्छाव

IMG_20231127_150304.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर

गडचिरोली( संजीव भांबोरे) : पत्रकार व कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दिनेश बनकर यांच्या सहकार्याने संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी दिनेश बनकर, जिल्हा संघटक हर्षकुमार साखरे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रितम जनबंधू, जिल्हा सचिव सोमनाथ उईके, जिल्हा कोषाध्यक्ष पंकज चहांदे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव माकडे, जिल्हा सहसचिव विजय शेडमाके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अश्विन बोदेले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य फुलचंद वाघाडे, सत्यवान रामटेके आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे. या नूतन कार्यकारिणीचा कालावधी नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ असा दोन वर्ष असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकऱ्यांना विभाग व राज्य कार्यकारिणीत संधी दिली जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here