Home नांदेड एकच धडक… विषय कडक… वर्षानुवर्षे रखडलेले कामे दोन महीन्यात पूर्ण.

एकच धडक… विषय कडक… वर्षानुवर्षे रखडलेले कामे दोन महीन्यात पूर्ण.

1221
0

आशाताई बच्छाव

IMG_20231127_150655.jpg

एकच धडक… विषय कडक… वर्षानुवर्षे रखडलेले कामे दोन महीन्यात पूर्ण.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलुरचे भुमिपुत्र शिवसेनेचे नेते जनसेवक धन्नुभाऊ जोशी यांच्या पाठपुराव्याला यश.
संतांचा वारसा असलेला देगलुर (देवग्राम) शहरातील विशाल नगर,कला नगर, गिता नगर ,विद्या नगर, प्रभाग क्रमांक १२ मधील रस्ते खड्डे आणि अतिक्रमणमुक्त करण्यासह पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, विद्युत व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यासाठी दर पाच वर्षांनी म्हणजे प्रत्येक निवडणूक आधी घोषणा करायचे व घोषणा पत्र सादर करायचे. काम व दिलेले अश्वासन नाममात्र तसेच कागदापुरते मर्यादित असुन निवडणूकीच्या काळात उमेदवार प्रत्येक जनतेच्या घरी जाऊन पाया पडून मतदान करा मी सर्व कामे करेन असे आवाहन करतात. निवडणूक नंतर निवडुन आलेले उमेदवार नाममात्र असुन पुढील निवडणूक येई पर्यंत प्रभागात फिरकत सुद्धा नाहीत. कोणाला विचारत हि नाहीत. प्रभागातील उद्भवणाऱ्या समस्या पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, विद्युत व्यवस्थेची कामे ई. सर्व कामे प्रलंबित असुन नागरीक निवडून दिलेल्या उमेदवार यांच्या कडे गेल्यास ठिक आहे… पाहू, मी लगेच कामाला लावतो, काम पूर्ण करुन घेतो, एवढेच अश्वासन द्यायचे. पण काम मात्र करायचे नाही. तर कधीकधी दुर्लक्ष करीत भेटत हि नाहीत. किंवा काही कारण देऊन विषय टाळणे असे होत असल्याने प्रभागातील विशाल नगर,कला नगर, गिता नगर ,विद्या नगर, प्रभाग क्रमांक १२ मधील नगरपरिषदेचे काम वर्षानुवर्षे प्रलंबित असुन बर्‍याच दशकांपासून शासनाचे लक्ष तर नाहीच. त्याच बरोबर नगरसेवक यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे प्रभाग १२ मधील नागरीकांनी बर्‍याच वेळा बोलून दाखवले. व कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रलंबित गोष्टींचा विचार करुन प्रभाग क्रमांक १२ मधील नागरीकांनी देगलुर शहरातील समाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शांत, संयमी स्वभावाचे पण कट्टर हिंदुत्ववादी बाळकडू धडाडीचे कार्यकर्ते अडीअडचणीला धावून येणारे जनसेवक देगलुर चे भुमिपुत्र शिवसेनेचे नेते धन्नुभाऊं जोशी यांची भेट घेऊन त्यांना प्रलंबित विषयासंदर्भात माहीती देऊन प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी विनंती केली. प्रभागातील नागरीकांचे समस्या ऐकून घेतले व प्रभागातील प्रलंबित कामाची पाहणी केली. व धनुभाऊ जोशी यांनी प्रभाग १२ मधील तुम्हाला होणाऱ्या त्रास सोडविण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करतो. असे शब्द धन्नुभाऊंनी प्रभागातील नागरीकांना दिलेत.
व दि २८/०८/२०२३ रोजी देगलूर नगर परिषदेला व उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे प्रलंबित असलेले काम लवकरात लवकर सुरू करुन पुर्ण करुन देण्याबाबत मागणी केली होती. पण नगर परिषद कुठलीही हालचाल न केल्यामुळे पुढे रखडलेले कामे व काही कारणास्तव स्थगिती दिलेल्या कामाचे पत्र देगलूर शिवसेना शहर संघटक धन्नुभाऊ जोशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदनाद्वारे मागणी करून प्रभागातील प्रलंबित कामे तसेच काही कारणास्तव स्थगिती देण्यात आलेले काम पूर्ण न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा धन्नुभाऊंनी दिला होता. व प्रभागातील नागरीकांच्या सहकार्याने वेळोवेळी शासनाकडे, स्थानिक व वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड तर्फे देगलूर नगर परिषदेला दि २५/०९/२०२३ रोजी लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई साठी जबाबदार रहाल असे पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. व देगलूर नगर परिषदेला खडे बोल सुनावले. त्यानंतर देगलूर नगर परिषद खडबडून जागे झाले व प्रलंबित विषय संदर्भात बैठक घेऊन चर्चा करुन कामाला लागले. तसेच प्रलंबित असलेल्या कामाला सुरुवात हि करण्यात आले. वर्षानुवर्षे या प्रभागात वास्तव्यास राहणारे नागरीक पुढ्यारांना प्रलंबित समस्या सांगुन व प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा बरीच वर्षे कुठल काम झालं नाही. पण दोन महिन्यांपूर्वी उपजिल्हा देगलुर शिवसेनेचे नेते धन्नुभाऊ जोशी यांना प्रभाग १२ येथील लोकांनी भेटुन आपल्या समस्या मांडल्या व प्रत्यक्ष प्रभागात धन्नुभाऊ यांना नेऊन प्रभागातील लोकांना होणार्‍या गैरसोय व त्रास दाखवून दिलं, धन्नुभाऊंच्या लक्षात आलं की सामान्य लोकांना ह्या देगलूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे किती त्रास होतो… या सर्व समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रभागातील सर्व जनतेला एकत्र करून लोकशाही मार्गाने लढा दिला. व हा लढा जनसेवक धन्नुभाऊंच्या वेळोवेळी संपर्क व पाठपुरावा केल्यामुळे यशस्वी झाला. यासाठी समस्त विघा नगर,गिता नगर,कला नगर,विशाल नगर वासी देगलूरचे भुमिपुत्र शिवसेनेचे नेते धन्नुभाऊ जोशी यांचे ऋणी असल्याचे सांगितले…..

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर
Next articleपोलिस जवानाच्या सुपुत्राचे राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत सुयश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here