Home नांदेड पोलिस जवानाच्या सुपुत्राचे राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत सुयश

पोलिस जवानाच्या सुपुत्राचे राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत सुयश

71
0

आशाताई बच्छाव

IMG_20231128_053607.jpg

पोलिस जवानाच्या सुपुत्राचे राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत सुयश

पवन कोळी आता चमकणार राष्ट्रीय पातळीवर

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

क्रीडा संचालनायाच्या वतीने सोलापूर येथे दि. २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पार पड़लेल्या १७ वर्षाखालील राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत शिळवणी येथील रहिवासी असलेला पवन सतीश कोळी याने छत्रपती संभाजीनगर विभागाचे नेतृत्व करुन उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे. सविस्तर देगलूर तालुक्यातील शिळवणी येथील रहिवाशी असलेले सध्या हा.मु. जालना येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले सतीश कोळी यांचा सुपुत्र पवन कोळी यास लहानपणापासूच खेळाची आवड होती. त्याने खिलाडूवृत्ती असलेल्या वडीलांसोबत नेहमी मैदानात उतरत टेनिसमध्ये प्राविण्य मिळविले. त्याची
खेळाची आवड पाहून सतीश कोळी यांनी त्याला संभाजीनगर, जालंधर आणि हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकाकडून टेनिसचे धडे दिले.

यावर्षी युवक व क्रीडा संचालनालयाच्यावतीने सोलापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत पवन कोळी याने सलग ५ फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करून यश प्राप्त केले आहे. त्याने थेट
राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले असून, तो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

बंगलोर येथे राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा पार पडणार आहे, त्यात तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. पूर्वतयारी तो दि ४ ते ८ डिसेंबर या कलावधीत वर्धा येथे आयोजित कॅम्पमध्ये तो सराव करणार आहे.

सध्या पवन हा हैदराबाद येथील लॉन टेनिस अकादमीत गेल्या वर्षीपासून दररोज सराव करत आहे. पवनचे राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Previous articleएकच धडक… विषय कडक… वर्षानुवर्षे रखडलेले कामे दोन महीन्यात पूर्ण.
Next articleजिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणींमुळेच वन्यप्राण्यांचे हल्ले भाई रामदास जराते यांचा आरोप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here