• Home
  • पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 30 जून : ⭕ कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक संकट असताना सर्वसामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीचे ग्रहण लागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काँग्रेसने वाढत्या इंधन दरावरुन राज्यभरात आंदोलन पुकारलं असताना सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment