Home Breaking News राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ...

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

114
0

 

🛑 राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 30 जून : ⭕ राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान, ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. दरम्यान, ३० जून रोजी लॉकडाऊन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊले उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात, असे राज्य सरकारने सांगितले आहे. त्याचप्रमाणे संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसेच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे.

‘३० जूनला टाळेबंदी संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका. आजही ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्यावर तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले

 

आहेत.

 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here