• Home
  • वडेट्टीवार हटवा! सारथी टिकवा…! मराठा क्रांती मोर्चाची मागणी ! ✍️ पुणे ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वडेट्टीवार हटवा! सारथी टिकवा…! मराठा क्रांती मोर्चाची मागणी ! ✍️ पुणे ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 वडेट्टीवार हटवा! सारथी टिकवा…! मराठा क्रांती मोर्चाची मागणी ! 🛑
✍️ पुणे ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सारथी संस्थेच्या स्थितीला जबाबदार असलेल्या बहुजन कल्याण विभाग आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना हटवावे म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अडवण्याचा प्रयत्न पुण्यात झाला. यावेळी थोरात यांनी संबंधितांना भेटून चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
यानंतर निघताना बाळासाहेब थोरात यांच्यासमोर हातात फलक धरून काही कार्यकर्त्यांनी विजय वडेट्टीवार यांना हटवावे म्हणून आंदोलन करण्यास सुरूवात केली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्याची काही सेकंद भेट घेवून पुढे जाणे पसंत केले.
तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सारथी संस्थेला सरकार पुरेशी मदत करत नसल्याचे मत यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आले…⭕

anews Banner

Leave A Comment