Home Breaking News टिकटाॅक होणार हद्द पार* *केंद्र सरकारने घेतला निर्णय* *मोहन शिंदे...

टिकटाॅक होणार हद्द पार* *केंद्र सरकारने घेतला निर्णय* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.*

185
0

*टिकटाॅक होणार हद्द पार*
*केंद्र सरकारने घेतला निर्णय*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.*

केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत चिनी कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. टीकटॉकसह 59 चिनी अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात रोष उफाळून आला. तसेच चिनी मालावर बहिष्काराचं आवाहन होत होतं. त्यातच चिनी मोबाईल अॅप धोकादायक असल्याची माहितीही गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत अॅपवर बंदीचा निर्णय घेतला आहे.
भारतात यापुढे टिकटॉकसह शेअरइट, युसी ब्राउजर, हॅलो, वुई चॅट, क्लीन मास्टरसह 59 अॅपवर बंदी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here