• Home
  • ठाणे जिल्ह्यात ३० हजार २कोरोनाग्रस्त ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

ठाणे जिल्ह्यात ३० हजार २कोरोनाग्रस्त ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

🛑 ठाणे जिल्ह्यात ३० हजार २८९ कोरोनाग्रस्त 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

⭕ ठाणे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या कमी होण्याची कोणतीच चिन्हे दिसून येत नाहीत. शुक्रवार, शनिवार प्रमाणे रविवारीही जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या एक हजार 345 तर, 38 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 30 हजार 289 तर मृतांची संख्या 985 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह मृतांच्या वाढत्या आकड्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. करोनाचा वाढत्या फैलाव लक्षात घेऊन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या काही शहरांमध्ये रविवारपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

रविवारी ठाणे महानगर पालिका हद्दीत 341 बाधितांची तर, 14 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 349 तर, मृतांची संख्या 296 वर गेली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 369 रुग्णांसह 6 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 5 हजार 678 तर, मृतांची संख्या 107 इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत रुग्ण १९७ असून चारजणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 200 तर, मृतांची संख्या 205 वर पोहोचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 50 बाधितांसह 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 740 तर, मृतांची संख्या 100 वर पोहोचली. त्यात मीरा-भाईंदरमध्ये 116 रुग्णांसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 51 तर मृतांची संख्या 139 इतकी झाली आहे. उल्हासनगर 101 रुग्णांची संख्या असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एका हजार 629 तर मृतांची संख्या 41 झाली आहे. अंबरनाथमध्ये 45 रुग्णांची नोंद असून झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 681 तर, मृतांची संख्या 40 झाली आहे. बदलापूरमध्ये 35 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 721 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 91 रुग्णांची तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 421 तर, मृतांची संख्या 42 वर गेली आहे.

पुन्हा लॉक डाऊन ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा काही विभागात करोना बाधित रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात करोना संसर्ग वाढणार्‍या विभागात पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

रुग्णांची संख्या वीस हजार होणार कल्याण-डोंबिवलीतील करोना रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरानंतर कल्याण-डोंबिवलीत प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा वेग पाहता येत्या 15 जुलैपर्यंत कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या वीस हजारांच्या घरात जाण्याची भीती पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासन या स्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून प्रत्येक प्रभाग स्तरावर करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेंटर्स निर्माण केली जात असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.⭕

anews Banner

Leave A Comment