Home सोलापूर टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून अत्यंत महत्त्वाच्या सूचना

टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून अत्यंत महत्त्वाच्या सूचना

18
0

आशाताई बच्छाव

1000271543.jpg

टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून अत्यंत महत्त्वाच्या सूचना
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने शहरी व ग्रामीण भागात नागरिक घरास कुलूप लावून गच्चीवर किंवा टेरेसवर जाऊन झोपतात. रात्रीचे सुमारास चोरटे लक्ष ठेवून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी करतात असे प्रकार घडलेले आहेत.
तरी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की त्यांनी गच्चीवर झोपते वेळी घरातील मौल्यवान वस्तू (सोने, चांदी, जवाहर, हिरे व रोख रक्कम) ही सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तसेच बाहेरगावी जातेवेळी वरील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात अथवा जवळचे विश्वासाचे नातेवाईक यांच्याकडे ठेवाव्यात, जेणेकरून चोरीस जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाडी-वस्तीवरील लोक घरामध्ये एकटेच राहणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करावा, ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत माहिती नसल्यास आपले गावातील पोलीस पाटील यांच्याकडून माहिती घ्यावी.
बाहेरगावी जाताना आपल्या शेजाऱ्यांना कळवावे व घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. बाहेरगावी जाताना शक्यतो घरातील एक सदस्य घरात असावा.सध्या गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती व हनुमान जयंती या सारख्या महत्त्वाच्या सणांचा कालावधी असल्याने घरामध्ये मौल्यवान वस्तू बाळगल्या जातात. परंतु त्या सुरक्षित रित्या बाळगाव्यात. आपल्या मौल्यवान वस्तू चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. एसटी स्टँड येथून प्रवास करताना शक्यतो कमी मौल्यवान वस्तू जवळ बाळगाव्यात. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चोरी करतात, प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंची चोरी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
रात्रीच्या वेळी चोरीच्या संदर्भाने काही प्रकार घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास 112, 02183- 231233 वर संपर्क करावा.असे टेंभूर्णी पोलिस स्टेशन ए पी आय
दीपक पाटील यांनी केले आहे.

Previous articleमुख्यमंत्री आदित्यनाथ योगी शहरात आले पाईपलाईन पूर्ववत केली परंतु आज पाण्याचा अपव्यय सुरू
Next articleडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य आठरा तास अभ्यासाचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here