Home रत्नागिरी युनाम शिखर सर करणाऱ्या रत्नागिरीतील दोघांचा थरारक अनुभव आकाशवाणीवर ऐकता येणार आज...

युनाम शिखर सर करणाऱ्या रत्नागिरीतील दोघांचा थरारक अनुभव आकाशवाणीवर ऐकता येणार आज सकाळी 11 :10 वाजता प्रसारित होणार मुलाखत

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0020.jpg

युनाम शिखर सर करणाऱ्या रत्नागिरीतील दोघांचा थरारक अनुभव आकाशवाणीवर ऐकता येणार
आज सकाळी 11 :10 वाजता प्रसारित होणार मुलाखत

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – नुकतेच रत्नागिरीतील दोन गिर्यारोहक हिमाचल प्रदेशातील लाहौल भागात असलेले माउंट युनाम हे 6111 मीटर उंचीवर असणारे शिखर यशस्वी चढाई करून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आहे. गृहरक्षक दलातील जवान आकाश पालकर आणि प्रसाद कासार या दोघांनी युनाम शिखर सर करून रत्नागिरीकरांसह सर्वच भारतीयांची मान उचांवली आहे. चोहौबाजूंनी या दोघांचे कौतुक होत आहे. यातच आता रत्नागिरी आकाशवाणी केंद्रानं त्यांची मुलाखत घेतली आहे. या दोघांची आकाशवाणीवर सौ. कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून आज, दि. १२ ऑगस्टला सकाळी ११ : १० प्रसारीत केली जाणार आहे. सदरची मुलाखत न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरसुद्धा सर्वत्र ऐकता येणार आहे.

गिर्यारोहक आकाश पालकर आणि प्रसाद कासार यांनी युनाम शिखर सर केल्याचा थरारक अनुभव त्यांच्याच तोंडून रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून जिल्ह्यावासियांना ऐकता येणार आहे.

Previous articleरत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी घेतली एकनाथजी शिंदेंची भेट
Next articleपानवल गावात विधवा प्रथा बंदीचा एकमुखी ठराव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here