Home रत्नागिरी भांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी यांना आरएचपी फाउंडेशनतर्फे मदतीचा हात

भांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी यांना आरएचपी फाउंडेशनतर्फे मदतीचा हात

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240322_170206.jpg

भांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी यांना आरएचपी फाउंडेशनतर्फे मदतीचा हात.                                 रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ)

आरएचपी फाउंडेशनतर्फे वरुण विश्वनाथ गोसावी (रा.भांबेड ता. लांजा) याला व्हीलचेअर देण्यात आली. व्हिलचेअर दिल्याबद्दल वरुणच्या आई वडीलांनी तसेच त्याच्या कुटुंबियांनी आरएचपी फाउंडेशनचे विशेष आभार मानले आहेत.

वरुण यांचा आठ महिन्यांपूर्वी झाडावरुन पडून अपघात झाला होता. केबलचे काम करण्यासाठी गावी आले असताना काम करताना चक्कर येऊन पडल्याने पाठीच्या मणक्याला मार लागला होता. यामध्ये तीन मणके फ्रॅक्चर झाले. कोल्हापूरला ॲस्टर आधार हॉस्पीटलमधे मणक्यावर ऑपरेशन झाले. मात्र कमरेपासून खाली सर्व संवेदना बंद झाल्या. त्यामुळे गेले आठ महिन्यापासून घरीच बेडवर झोपून आहेत. बेडसोअर असल्याने त्यांना बसता येत नाही, पाठीचा बॅलन्स जातो. घरच्यांच्या मदतीने त्यांना उठून बसावे लागते.

वरुण गोसावी यांचे लग्न झाले असून पत्नी व मुलगी त्यांच्यासोबत राहतात. वरुण गोसावी हे मुंबईत खासगी कंपनीमधे वायरमन म्हणून कामाला होते. परंतु गावी कामासाठी आले आणि दुर्दैवाने त्यांना अपंगत्व आले. त्यांच्या औषधोपचारांसाठी लाखो रुपये खर्ची पडले, पण काही उपयोग झाला नाही. त्यांच्या या आजारची माहिती रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादीकभाई नाकाडे यांना समजली. त्यांनी वरुणची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. त्याचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे आणि त्याच्या घरच्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी वरुणच्या सोईची व्हीलचेअर हवी होती.

श्री सादिक नाकाडेंनी व्हीलचेअरसाठी आवाहन केले, त्या आवाहनाला साद देवुन रत्नागीरीच्या पी.डब्ल्यु.डी मध्ये कार्यरत असलेल्या सौ.वैशाली नारकर यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी त्यांचे वडील कै.मुकुंद राम गांधी यांच्या स्मरणार्थ व्हीलचेअर डोनेट केली. व्हीलचेअर वाटप करते वेळी सौ.वैशाली नारकर, भाऊ संकेत मुकुंद गांधी, तन्वी विश्वास खातु, आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादीक नाकाडे, सदस्य श्री समीर नाकाडे, प्रिया बेर्डे तसेच वरुण गोसावी आणि त्याचे भावोजी श्री प्रमोद गुरव उपस्थित होते.

Previous articleरोड शो, लाऊडस्पीकर साठी परवानगी आवश्यक; 3 चाकी, 4 चाकी वाहनांवरील बॅनरला बंदी
Next articleE.P.S.95, पेंशन संघर्ष समितीची अमरावती येथे सभा संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here