Home मुंबई मुंबईत यंदा दसरा मेळावा कुणाचा?

मुंबईत यंदा दसरा मेळावा कुणाचा?

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0036.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: दसरा मेळावा कोणाचा? शिवतीर्थावर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने याही वर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने महानगरपालिकेला परवानगी मागितली असता, परवानगीसाठी अर्ज दाखल करून सहा ते सात दिवस उलटले तरीही आतापर्यंत कुठलेही महापालिकेकडून प्रतिसाद आलेला नाही. शिवसेनेला या दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षापासून या ठिकाणी शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसैनिकांच्या सोबत पार पडत आहे. यावर्षी शिवसेना गट आणि शिंदे गट असे दोन गटाच्या माध्यमातून दोन गटाच्या संघर्षात शिवसेना मेळावा शिंदे गटांकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न होत आहे असं शिवसेनेचे मत आहे. हा राजकारणातील रडीचा डाव आहे तो खेळू नका असे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले आहे. वारंवार परवानगी मागूनही परवानगी मिळत नाही असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावरती देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे मला माहित नाही. परंतु गृहमंत्री म्हणून एक सांगतो की जे कायद्यात बसेल ते होणार. या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व शिवसैनिकांना संबोधित करत असतात . शिवसेनेची पुढील वाटचाल काय याबद्दल बोलत असतात .यावर्षी हा मेळावा होणार की नाही याबाबत शंकाच निर्माण होत चालली आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही .त्यामुळे हा दसरा मेळावा कोणाचा असाच प्रश्न निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here