Home मुंबई मनस्वी ग्रुप आयोजित आरोग्य शिबीर संपन्न.

मनस्वी ग्रुप आयोजित आरोग्य शिबीर संपन्न.

36
0

Yuva maratha news

1000312559.jpg

मनस्वी ग्रुप आयोजित आरोग्य शिबीर संपन्न.

मुंबई – युवा मराठा प्रतिनिधी विजय पवार.
मनस्वी ग्रुप व साण्डू फार्मास्युटिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी आयुर्वेदिक आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबीरामध्ये महिलांच्या नियमित आजारांसोबत गुप्तरोग त्यांच्या जीवन प‌द्धतीने निर्माण होणारे आजार यावर उपचार करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांच्या आजारांचा सु‌द्धा समावेश होता.
मनस्वी ग्रुपचे संस्थापक यांच्या आईच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त हे शिबीर कराळेवाडी ता. कर्जत येथील आदिवासी विभागात घेण्यात आले होते. या गावा शेजारील आदिवासी पाड्यांतील कष्ट करणाऱ्या महिलांसाठी महिला डॉक्टरांची विशेष तुकडी तयार करण्यात आली होती. व त्यांच्या आजारांवर उपचार करण्यात आले. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यांची २० डॉक्टरांची एक टिम या शिबिराच्या उपचाराचे काम पाहत होती. गुप्त आजार व प्रभात ट्रस्टच्या नेत्र चिकीत्सा विभागात महिलांची जास्त गर्दी दिसून आली.
यावेळी संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या सुद्धा आजारांवर डॉक्टरांचा सहभाग असल्यामुळे अपघात, लहानपणापासूनचे अंधत्व, अपंगत्व असलेल्या बालकांचा यात जास्त समावेश झाला होता. व ज्येष्ठ नागरिकांनी शेतात काम करताना होणाऱ्या आजारांसाठी डॉक्टरांकडून खास करून उपचार करून घेतले.
शिबीराचे उद्‌घाटन प्रभात ट्रस्टचे डॉ. प्रशात थोरात, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष सावंत, हेमंत तावडे यांच्या हस्ते करण्यात आहे. पोद्दार रुग्णालयांच्या अधिष्ठाता डॉ. संपदा संत, डॉ.दिप नारायण शुक्ला, आरोग्य विभागातील अधिकारी नरसू पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. शिबीराचे प्रमुख्य वैशिष्ट म्हणजे जीवन विद्या मिशनचे व्याख्याते प्रथमेश शिवगण यांनी केलेले नशामुक्ती मार्गदर्शन.
नामवंत आयुर्वेदिक कंपनीकडून लाखों रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आले. तसेच गावातील रुग्णांना व्हील चेअर व चष्म्याचे सुद्धा मोफत वाटप करण्यात आले.
समाजसेवी संस्थेचे विश्वस्त समाजसेवक अंकुश रवंदळ, प्राध्यापक अमर सावंत, सामाजिक कार्यकर्ते मंगेश साळोखे यांनी अदिवासी पाड्यामध्ये जाऊन रुग्णांना सेवा दिली.
आदिवासी पाड्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक व गरिब लहान मुलांची सेवा करण्याचा खुपच आनंद झाला. गाव खेड्यांमधील शिबीर राबविण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु प्रतिसाद बघून खुप आत्मविश्वास वाढला असे मत मनस्वी ग्रुपचे संस्थापक विजय झिमुर यानी मांडले.
मनस्वी ग्रुपचे विश्वस्त सूर्यकांत गायकवाड, शंकर झिमुर, दिनेश झिमुर, वीणा पवार,शर्वरी जाधव सोनाली झिमुर, प्रियांका झिमुर, वर्षा गायकवाड यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले व शिबीर संपन्न करण्यात मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here