Home मुंबई लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची २३ एप्रिल २०२४ रोजी...

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची २३ एप्रिल २०२४ रोजी यात्रा

18
0

आशाताई बच्छाव

1000302550.jpg

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची २३ एप्रिल २०२४ रोजी यात्रा

रत्नागिरी- खेड ( विजय पवार प्रतिनिधी )
तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्रीरामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी होत आहे.ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे.परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत व सह्याद्री पर्वत रांगावर विराजमान झालेल्या अर्थात सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसले आहे.ह्या निसर्गरम्य गावातील ग्रामदेवता श्रीरामवरदायिनीमाता आदिशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे.देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने, श्रध्देने साजरे केले जातात.देवीचे मंदिर हेमाडपंती असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे.देवीची मूर्ती कर्नाटक येथून घडवून आणण्यात आली आहे.अशा या जागृत देवीची यात्रा मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात पार पडणार आहे.सायंकाळी ६ वाजता लाट चढविण्यात येते.७ वाजता देवीची आरती झाल्यानंतर रात्री ९ वाजता परिसरातील देवदेवतांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे.देवी-देवता बरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि मनोगत रात्री १० वाजता,रात्री ११ वाजता ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढला जातो.व रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवला आहे.हा परंपरागत देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्र मंडळी आप्तेष्टांसह उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ व ग्रामविकास मंडळ चोरवणे,मुंबई – पुणे यांनी केले आहे.

Previous articleबीडच्या पांढरवाडी गावात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू ; तीन लाखाचे नुकसान
Next articleकु. अस्मिता कांबळे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here