Home बीड बीडच्या पांढरवाडी गावात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू ; तीन लाखाचे नुकसान

बीडच्या पांढरवाडी गावात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू ; तीन लाखाचे नुकसान

26
0

आशाताई बच्छाव

1000302545.jpg

बीडच्या पांढरवाडी गावात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू ; तीन लाखाचे नुकसान

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड – जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा खूपच जोरदार असून काल दिवसभर तापमान जवळपास ४२ डिग्री सेल्सिअस गेल्यामुळे हवेमध्ये उष्णतेची लाट पसरली होती. यामध्ये दुपारी पाच नंतर अचानक विजांचा कडकडाट आणि गडगडात पाहायला मिळाला. यातच बीडच्या पांढरवाडी गावात वीज पडल्याने चार जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास ०३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतामध्ये बांधलेली जनावरे ती गोठ्यात बांधायची होती मात्र काही वेळातच अचानक वीज पडल्याने शेतकरी दिलीप उत्तम शेळके दोन बैल व दोन दुभत्या गाई या मरण पावले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक नुकसानीचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अवकाळी पावसाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.

Previous articleपोलीस अधीक्षकांचा फोटो आणि नाव वापरून सायबर भामट्याने घातला धुमाकूळ
Next articleलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची २३ एप्रिल २०२४ रोजी यात्रा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here