Home नाशिक मेशी येथे धाडसी चोरी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास.

मेशी येथे धाडसी चोरी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास.

167

आशाताई बच्छाव

1000307134.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी)
देवळा :- मेशी येथे धाडसी चोरी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास.
मेशी ता. देवळा येथे जगदंबा माता चौकापासून हाकेच्या अंतरावर राहत असणाऱ्या दिलीप तारू शिरसाठ यांच्या राहत्या घरी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून एक लाख एकोनसत्तर हजार रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम दीड लाख रुपये असा ऐवज लंपास केला .शिरसाठ हे पत्नी ,मुलगा व सुना यासोबत दि.२१ एप्रिल रोजी मळ्यात मुक्कामी होते घराला कुलूप असल्याने रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडुन घरात शिरले व कपाटाचे देखील कुलूप तोडत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला सकाळी शेजारी राहत असलेल्यांच्या लक्षात आले की शिरसाठ यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले आहे त्यामुळे त्यांनी तात्काळ शिरसाठ यांना कळविले. शिरसाठ यांनी तात्काळ देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात भा. द.वि. कलम 457, 380 नुसार देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील हे करीत आहेत.
दरम्यान सुमारे अडीच महिन्यांपूर्वी गावातील एक किराणा दुकान चोरट्यांनी फोडले त्या घटनेचा तपास लागत नाही तोच चोरट्यांनी दुसरी मोठी चोरी केली असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Previous articleअंबाजोगाईच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन गटात तुफान हाणामारीत आठ गंभीर
Next articleशेकडोंच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प ;नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.