Home बीड अंबाजोगाईच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन गटात तुफान हाणामारीत आठ गंभीर

अंबाजोगाईच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन गटात तुफान हाणामारीत आठ गंभीर

89
0

आशाताई बच्छाव

1000305450.jpg

अंबाजोगाईच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन गटात तुफान हाणामारीत आठ गंभीर

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि: २२ – अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय अपघात विभागात दोन गटात तुफान हाणामारी झाली. तेथील महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. अंबाजोगाई नगरीत आनंदनगरी हे लहान मोठ्यांसाठी विरंगुळा म्हणून राहटपाळणे विविध खेळाचे, पदार्थाचे दुकाने असलेला समूह आनंद नगरी म्हणून अंबाजोगाईत आला होता. यात समोरासमोर असलेल्या दोन गटात मारामाऱ्या झाल्या त्यानंतर ते उपचारार्थ शासकीय रुग्णालयात गेले असता तिथे हे दोन्ही गट पुन्हा आमने सामने आले व अपघात विभागात एकमेकांना भिडले व तुफान हाणामारी चालू झाली. या हाणामारीत आठ जण गंभीर जखमी झाले असून तेथील डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन बसले होते. तेथे उपचारार्थ असलेले रुग्ण घाबरून गेले अशातच तेथील सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत हाणामारी करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर पोलिसांनी येऊन मोर्चा सांभाळला असून सध्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पोलीस छावणीचे रूप आले आहे. तरी या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालावे अशी रुग्णालयीन वरिष्ठ डॉक्टरअधिकाऱ्यांची व नागरिकांची मागणी आहे.

Previous articleशरद पवार यांनी मागितली अमरावती कराची माफी, माझ्याकडून मागील पंचवर्षीक निवडणूक मध्ये चूक झाली.
Next articleमेशी येथे धाडसी चोरी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here