Home अमरावती शरद पवार यांनी मागितली अमरावती कराची माफी, माझ्याकडून मागील पंचवर्षीक निवडणूक मध्ये...

शरद पवार यांनी मागितली अमरावती कराची माफी, माझ्याकडून मागील पंचवर्षीक निवडणूक मध्ये चूक झाली.

65
0

आशाताई बच्छाव

1000305341.jpg

शरद पवार यांनी मागितली अमरावती कराची माफी, माझ्याकडून मागील पंचवर्षीक निवडणूक मध्ये चूक झाली.
__________
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठिंब्याच्या बळावर नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघ त विजय मिळवला होता. या विजयानंतर राणा यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे साथ सोडून भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. तसेच नवनीत राणा यावेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहे. दरम्यान आज अमरावतीमध्ये महाविकास आघाडी प्रचार सभेसाठी आलेल्या शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर घनाघाती टीका केली.मागच्या वेळी आमच्याकडून अमरावती मध्ये एक चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतोआज ती चुक दुरुस्त करायची आहे. असे विधान शरद पवार यांनी केले. राज्यातील विरोधी पक्ष महावितरण आघाडीची प्रचार सभा आज अमरावती येथे झाली. या प्रचार सभेत शरद पवार, उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर आदी मविआचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी मतदारांना संबोधित करताना हे विधान केले. शरद पवार महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत करताना म्हणाले की, आज मी येथे आलो आहे ते एक गोष्ट सांगण्यासाठी की, मला अमरावती करांची माफी मागायचे आहे.एक माझ्याकडून झाली. पाच वर्षा पूर्वीची लोकसभेची जी निवडणूक होती यावेळी लोकसभेच्या मतदान करा. नाही जाहीर सभा घेतल्या. माझ्या संदेश स्वीकारल्या आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं. मात्र पाच वर्षाचा अनुभव आल्यानंतर कधीतरी येथे यावे आणि अमरावती करांना सांगावे की आमच्याकडुन चुक झाली.अस मला वाटतं होतं.ही चुक पुन्हा कधी होणार नाही.ती चुक दुरुस्त करण्यासाठी ज्याच्या सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक जीवन अत्यंत स्वच्छ आहे.अशा बळवंत वानखडे यांना तुम्ही मोठ्या मताधिक्यने निवडुन ध्या,असे आवाहन शरद पवार यांनी केले. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका केली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशात जे जे पंतप्रधान झाले त्यांच्या कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे. हे नेते कानाकोपऱ्यात जायचे.भाषण द्यायचे. नवा भारत कसा उभा करायचा यासाठी लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल आता संदेश द्यायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू टीका करतात. काँग्रेसवर टीका करतात, जवाहरलाल नेहरू चे योगदान देशाच्या इतिहासातून कोणीही असू शकत नाही अशी ती काही टिकाही शरद पवार यांनी केली.

Previous articleवैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश
Next articleअंबाजोगाईच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन गटात तुफान हाणामारीत आठ गंभीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here