आशाताई बच्छाव
वरवट बकाल येथे ढोलताशे, नाचगाने, फटाक्यांच्या आतिषबासह वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या एकत्रित एकाच मिरवणुकीत बाप्पाचे आगमन
युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर
मागील दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर गणेश उत्सवामध्ये तल्लीन झालेल्या भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे या दोन वर्षानंतर महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस आनंदात पार पडत आहेत संपूर्ण देशात त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रात पारंपरिक उत्साह गणेश उत्सव या भक्तीमय रसात भाविक चिंब झालेले आहे ! पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचे आगमन यावर्षी उत्साहात पार पडत आहे.१४ विद्या, आणि ६४ कलांगुण असलेला बाप्पाचा हा १० दिवसांचा सोहळा करोना काळात थांबलेला होता आणि तो पुन्हा पहिल्यांदाच पुर्ववत सुरु झालेला आहे त्यामुळे यावर्षी सर्वीकडे गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे, ढोलताशांच्या गजरात बापांचा आगमन मोठ्या जल्लोषात होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील बाजारपेठ तसेच मध्यवर्ती केंद्र बिंदू असलेले वरवट बकाल येथे गणरायाचे काल दिनांक ३१ ऑगेस्ट रोजी मोठया थाटामाटात आगमन पाहायला मिळाले आहे. त्यामध्ये गावातील सार्वजनिक गणेश मंडळ यांनी गावातील काही सप्तशृंगी गणेश मंडळ तसेच नवयुवक गणेश मंडळ या सर्व मंडळांच्या बाप्पाच्या वेगवेगळ्या ट्रॅक्टर मधुन एकत्रित घेऊन जल्लोषात मिरवणूक काढली त्यामध्ये ढोलताशे,फटाक्यांची आतिषबाजी सार्वजनिक नाचगान्याणसह बस स्टॅंड वरून गावातील वेगवेगळ्या मंडळातील बाप्पाच्या निवासस्थाना पर्यंत बाप्पा च्या गर्जना केल्या आणि बाप्पांचे आगमन झाले आहे.
यावेळी बुलढाणा वरून आलेल्या स्ट्रायकिंग फोर्स पोलीस पथक तसेच स्थानिक पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.






