Home मुंबई राज ठाकरे- शिंदे सरकार यांच्यामध्ये काय शिजतंय!

राज ठाकरे- शिंदे सरकार यांच्यामध्ये काय शिजतंय!

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0028.jpg

पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: राज ठाकरे- शिंदे सरकार यांच्यामध्ये काय शिजतंय! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आज गणपती दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर त्यांच्या भेटीसाठी आले. सत्ता पालट झाल्यानंतर शिंदे सरकार व राज ठाकरे यांची पहिलीच भेट .भाजप व मनसे यांच्यामध्ये काय आहे यापेक्षा शिवसेनेचे शिंदे गट असे म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांचं व राज ठाकरे यांचं अनेक दिवसापासून काहीतरी राजकीय खलबत्त चालली आहेत असं सर्वांना वाटते. त्यामध्येच यांच्या ह्या भेटीगाठी हे एक बरच काही सांगून जाते .आज गणेश दर्शन की मैत्रीचा श्री गणेशा याचाही प्रसार माध्यमांमध्ये विचार होत आहे .मनसेने आतापर्यंत शिवसेनेची मते नेहमीच फोडलेली आहेत. त्याचबरोबर भाजपाचाही असा डाव असू शकतो की एकनाथ शिंदे यांच्या साथीने राज ठाकरे बरोबर आले तर समस्त मराठा मोठा प्रमाणात असलेले मतदाते एकत्र येतील. आणि भाजपाला बळकटी मिळेल असाही डावपेच त्या पाठीमागे असू शकतो. असं माध्यमांचं म्हणणं आहे. नव्या समीकरणासाठी प्रयत्न आहेत का अशी शंका उत्पन्न होऊ लागली आहे. गेले काही दिवसापासून गाठीभेटी वाढत चालले आहेत .त्याच्या मागचे काही कारण गुलदस्त्यात आहे हे अजून तर समजलेले नाही. एकंदरीतच काय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिंदे सरकार यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून भेटीगाठी सुरू आहेत हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here