Home नांदेड येवती शिबिरातुंन ३८ मोतीबिंदु रुग्णांचे झाले ऑपरेशन. ▪️ गरिब व गरजू रुग्णांना...

येवती शिबिरातुंन ३८ मोतीबिंदु रुग्णांचे झाले ऑपरेशन. ▪️ गरिब व गरजू रुग्णांना मोफत शिबिरांचा झाला मोठा लाभ

124
0

राजेंद्र पाटील राऊत

येवती शिबिरातुंन ३८ मोतीबिंदु रुग्णांचे झाले ऑपरेशन.

▪️ गरिब व गरजू रुग्णांना मोफत शिबिरांचा झाला मोठा लाभ

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

येवती येथील रक्त व नेत्ररोग तपासणी शिबिरातुन ३८ मोतिबिंदू रुग्णांचे ऑपरेशन केले आहे. हे नेत्ररोग शिबिर शंभर टक्के यशस्वी ठरले असून त्यामुळे गरिब व गर्जु रुग्णांना मोफत नेत्ररोग शिबिरांचा मोठा लाभ झाला आहे.

मुखेड तालुक्यातील मौजे येवती येथे शिवजयंतीचे औचित्य साधुन २० फेब्रुवारी २०२२ रोजी येवती ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या रक्त व मोफत नेत्ररोग तपासणी शिबिरात एकुण १८५ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यापैकी १६७ रुग्णांची ब्लड चेक करण्यात आले आहे.
तसेच नेत्ररोग तपासणी शिबिरातुन १६७ रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी मोतिबिंदूचे ३८ रुग्ण सापडले आहेत. त्वरित अशा
३८ मोतिबिंदु रुग्णांचे उदगीर येथील उदयगिरी लायन्स क्लबच्या वतीने यशस्वी ऑपरेशन करून परत घरपोच सोडण्याचे काम येवती ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने झाले आहे. त्यामुळे गरीब व गर्जु रुग्णांना या शिबिराचा मोठा लाभ झाल्यानें येवती ग्राम पंचायतीचे विशेष आभार मानीत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल गावातील नागरीकांतुन व रुग्णातुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous articleमच्छी विक्री उघड्यावर कारवाईची मागणी         
Next articleप्रा.अनिल भेलोंडे यांचे नेट परीक्षेत यश संपादन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here