Home बुलढाणा द श्री अकॅडेमी वरवट बकाल येथे एक अनोखी विज्ञान प्रदर्शनी सोहळा संपन्न

द श्री अकॅडेमी वरवट बकाल येथे एक अनोखी विज्ञान प्रदर्शनी सोहळा संपन्न

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20230115-WA0063.jpg

द श्री अकॅडेमी वरवट बकाल येथे एक अनोखी विज्ञान प्रदर्शनी सोहळा संपन्न!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील द श्री अकॅडेमी येथे एक अनोखी विज्ञान प्रदर्शनी चा सोहळा दिनांक 14 जानेवारी रोजी पार पडला आणि ह्या प्रदर्शनी मध्ये अनेक नवनवीन उपक्रम आपणाला बघायला मिळाले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र सुद्धा मिळाले .द श्री अकॅडेमी ह्यांचे हे तिसरे विज्ञान संमेलन होते.अतिशय कमी वेळात म्हणजे 2018 मध्ये स्थापन झालेल्या द श्री अकॅडेमी मध्ये आज 600 ते 700 विद्यार्थी आहेत.आणि शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल आपणाला दिसतात.कुठल्याही प्रकारची मार्केटिंग न करता ह्या द श्री अकॅडेमी चे संचालक प्रा.सुनिल डांबरे हे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर तसेच त्यांच्या सर्वागिण विकासावर आवर्जून लक्ष देतात. जसे अकॅडेमी तर्फे अनेक स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात शुद्धलेखन स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,सामान्य ज्ञान स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी ,वार्षिक स्नेहसंमेलन इत्यार्दी. ह्या अकॅडेमी मध्ये वर्ग KG-2 ते वर्ग 10 तसेच नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा ह्या सर्व वर्गांचे स्वतंत्र क्लास अकॅडेमी मध्ये घेतल्या जातात.विशेष म्हणजे प्रवेशासाठी अक्षरशः रांग लावावी लागते हे विद्यार्थ्यांचा विकास दर्शविते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here