Home नाशिक ऑनलाईन पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात सपन्न…

ऑनलाईन पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात सपन्न…

122
0

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0064.jpg

ऑनलाईन पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात सपन्न…                                      नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
दि. ३०/७/२२ वार शनिवार नांदगाव जे .टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. आधुनिक ऑनलाईन पद्धतीने मतदान करून शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यात येणार आहे.
भारत हा जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही असलेला प्रजासत्ताक देश आहे आपण गावापासून ते देशापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया राबवीत असतो अगदी अशाच पद्धतीची निवडणूक प्रक्रिया जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्येही शालेय मंत्रिमंडळ प्रस्थापित करण्यासाठी वापरण्यात आली. वेगवेगळ्या पदांसाठी शालेय विद्यार्थी रिंगणात उभे होते. यावेळी निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा उत्साह अवर्णनीय होता. तसेच मतदान करणाऱ्या विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षकही उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले होते.
संस्थेचे चेअरमन माननीय, श्री. सुनील कुमार कासलीवाल व सेक्रेटरी, श्री. विजय चोपडा,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदीवाल,अंकुर कासलीवाल सर्व पदाधिकारी प्राचार्य मणी चावला, शिक्षक यांनी मतदान कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहून रेबीन कटकरून मतदान करत मतदानास सुरुवात केली. सदरील निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून शाळेतील शिक्षक सुदर्शन चोळके, ललित मोरे, नूर मॅडम यांनी काम पाहिले. शेवटी क्लोज बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनी चावला सर उमेदवारासमक्ष निकाल जाहीर करणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here