Home पुणे अजित गव्हाने यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण पवार यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

अजित गव्हाने यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण पवार यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0063.jpg

अजित गव्हाने यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण पवार यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
प्रतिनिधी उमेश पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार यांच्या वतीने सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना पेन बॉक्स, पेन्सिल बॉक्स, परीक्षा पॅड, वह्या अशा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.     यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, श्यामभाऊ जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, राजू लोखंडे, इंद्रायणी देवकर, उज्ज्वला ढोरे, नितीन सोनवणे, राजेंद्र रणसिंग, शाळेचे प्राचार्य साळवी सर, शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्राचार्य साळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले, की अरुण पवार प्रत्येक वेळी आमच्या शाळेसाठी सहकार्य करत असतात. तसेच वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून प्रत्येक वर्षी गोरगरिबांची मदत करतात. अनाथाश्रमातील मुलांसाठीही सतत मदत करीत असतात.

Previous articleजिंतूर तालुक्यातील कावी, घागरा, दहेगाव कोरवाडी, वडी,वाघी, सावंगी (भां) येथील परिसरातून सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान
Next articleऑनलाईन पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात सपन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here