Home परभणी जिंतूर तालुक्यातील कावी, घागरा, दहेगाव कोरवाडी, वडी,वाघी, सावंगी (भां) येथील परिसरातून सततच्या...

जिंतूर तालुक्यातील कावी, घागरा, दहेगाव कोरवाडी, वडी,वाघी, सावंगी (भां) येथील परिसरातून सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0005.jpg

जिंतूर तालुक्यातील कावी, घागरा, दहेगाव कोरवाडी, वडी,वाघी, सावंगी (भां) येथील परिसरातून सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

 

शुक्रवारी रात्री सात च्या दरम्यान एक तास ढगफुटी सद्रुश पाऊस तसेच शनिवारी दुपारी तीन च्या दरम्यान देखील परत ढगफुटी सद्रुश पाऊस झाला

शेतकरी वर्गाकडुन तात्काळ मदतीची मागणी

जिंतूर :-तालुक्यातील सावंगी भांबळे,कावी,कोरवाडी, दहेगाव घागरा,वाघी,वडी,आणि तालुक्यातील बर्याच भागात मागील एक महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे वाढ थांबून सर्व जमिनीनी पाणी धरल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे या मुळे बहुतांश शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत आणि पीक पिवळे पडत आहेत या मध्ये सोयाबीन ,तूर ,कापूस इतर पिकांचा समावेश आहे जून महिना कोरडा गेला होता शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेर्णिला सुरुवात केली मात्र जेव्हापासून शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हा पासून पाऊस थांबायला तयार नाही पावसाच्या आगमनासाठी व्याकुळ झालेला बळीराजा मागील एक महिन्यांपासून चालू असलेल्या पावसामुळे त्रस्त झाला आहे
काही शेतकर्यानी केली दुबार पेरणी
तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी एकदा पेरणी केल्या नंतर ही सोयाबीन निघाले नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असतांना देखील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते कसे बसे ते पीक जमिनीतून वर निघाले तेव्हा पासून पाऊस सुरू झाला तर अजूनही चालूच आहे परिणामी पिकांचे आधिक नुकसान झाले आहेत आणि वाढ देखील खुंटली आहे त्यामुळे बळीराजा आधिकच हवालदिल झाला आहे …त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी असे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे …

प्रतिक्रिया:- मी माझ्या शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली आहे एवढे महागामो लाचे बी शेतात पेरले नेमकेच अंकुर वर आले होते तेव्हापासून सततच्या पाऊस चालू असल्यामुळे आमचे शेतात पूर्ण पाणीच पाणी झाले आहे आणि माझ्या शेतातील पीक पूर्ण पने पिवळे झाले आहे आणि करपत आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ आमच्या शेतातील नुकसान ग्रस्त पिकांचा पंचनामा करून आम्हाला हेक्टरी पन्नास हजाराची मदत करावी …
भानुदास मोरे -सावंगी भांबळे ,डिगांबर लिपणे -कावी, धनेश काठमोरे-कावी,संदिप तरटे-कावी

Previous articleराज्यपाल कोश्यांरीचे मराठी माणसाबद्दल बेताल वक्तव्य सर्वत्र निषेध
Next articleअजित गव्हाने यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण पवार यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here