• Home
  • 🛑 *सोमाटणे येथील दोन शिक्षकांनी उचलला ऑनलाइन शिक्षणाचा विडा….रोज महाराष्ट्रातील सुमारे 500 विद्यार्थी असतात उपस्थित* 🛑

🛑 *सोमाटणे येथील दोन शिक्षकांनी उचलला ऑनलाइन शिक्षणाचा विडा….रोज महाराष्ट्रातील सुमारे 500 विद्यार्थी असतात उपस्थित* 🛑

🛑 *सोमाटणे येथील दोन शिक्षकांनी उचलला ऑनलाइन शिक्षणाचा विडा….रोज महाराष्ट्रातील सुमारे 500 विद्यार्थी असतात उपस्थित* 🛑

सोमाटणे, (पुणे )⭕– सोमटणे येथील रहिवासी असलेले सुरेश सुतार आणि लक्ष्मीकांत मुंडे यांनी जणू ऑनलाईन शिक्षणाचा विडाच उचलला आहे गेल्या 5 महिन्यापासून ते 9 वि आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत आणि त्यांच्या या प्रयोगाला अफलातून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या ध्येय वेड्या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी अधिक माहिती अशी की सुरेश सुतार हे तुळजा भवानी विद्यालय सोमाटणे येथे तर लक्ष्मीकांत मुंडे हे ग्रामप्रबोधिनी विद्यालय साळुंब्रे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत गेल्या 20 मार्च ला कोरोना व्हायरसची जीवघेणी साथ पसरली आणि सर्व शाळा, कॉलेज, दुकाने , बाजारपेठा सगळ्या एकाएकी बंदिस्त केल्या गेल्या.

शाळा बंद झाल्याने शिक्षणाची अडचण भासू लागली तसेच पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता स्वस्थ बसू देत नव्हती आठवडा झाला ,पंधरवाडा झाला वाट पाहून तरी बंदी काय उठायची चिन्ह दिसत नव्हती त्यामुळे
सुरेश सुतार आणि लक्ष्मीकांत मुंढे यांनी ऑनलाइन का होईना पण शाळा भरवायची असा चंगच जणू बांधला आणि
पहिल्यांदा मग सुतार यांच्या घरी ही शाळा भरवायची .पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था आयसर येथून प्रशिक्षण घेतल्याने या दोघांनाही हे अवघड वाटले नाही. आणि याच कल्पनेतून त्यांनी एक यु ट्यूब चॅनेल काढले आणि आज या शाळेत रोज सुमारे400 ते 500 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातुन ऑनलाईन उपस्थित राहतात .सुतार याना त्यांच्या या प्रयोगाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्या चॅनेल ला Learn from home हेच नाव देऊन आम्ही हे चॅनेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल यासाठी प्रयत्न करू आणि शाळा बंद जरी असली तरी शिक्षण मात्र सुरू ठेवू असा विश्वास यावेळी बोलून दाखवला.

सुतार आणि मुंडे या दोघांनाही संगणकावर पी. पी. टी. तयार करण्याचा आणि तिच्या आधारे वर्गात शिकवन्याचा छंद गेल्या 10 ते 15 वर्षा पासून होता . या छंदाचा वापर करून या फोडणी पी. पी. टी. तयार केल्या आणि याद्वारे ते ऑनलाइन वर्ग घेत आहेत त्यामुळे विद्यार्थी या वर्गात रमतात आणि आपल्या भविष्याला आकार देत आहेत असेही मुंडे यांनी सांगितल.
या पद्धतीने आम्ही लॉकडाउन सुरू झाल्यापासून एकही दिवस खंड न करता रोज सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आम्ही दोघेहीजण गणित भाग 1 व 2 इयत्ता 9 वी व इयत्ता10 वी या दोन्ही वर्गाचे ऑनलाईन तास दररोज घेत आहोत. यात आणखी भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकानंही प्रशिक्षण देऊन कसे पी पी टि बनवायचे आणि ते ऑनलाईन करायचे याचेही इथंभूत प्रशिक्षण दिले आहे त्यामुळे आता काही शिक्षक सुद्धा तयार झाले आहेत ही फार महत्वाची बाब आहे .

या लॉकडाउन मध्ये खूप शिक्षकांना ऑनलाईन पद्ध्तीने तास घेण्यास व्हिडीओ तयार करण्यास मदत केली तसेच त्यांचे सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेतलंआपल्या कडे असणारे ज्ञान आणि कौशल्य हे इतरापर्यंत कसे देता येईल हाच उद्देश होता
हे दोघेही सध्या अहोरात्र मेहनत करून रोज दिवसभर एखाद्या प्रकरणावर पी. पी. टी. बनवतात व त्या आधारे संध्याकाळी ऑनलाइन लेक्चर घेतात .
यातून आम्हाला फार मोठा आनंद मिळतो .आता साधारण पणे आम्ही दोघे मिळून 150 ते 200 व्हिडीओ तयार केले आहेत.
आणि ते व्हिडीओ आमच्या learn from home या चॅनेल वर हजारो विध्यार्थी या लॉकडाउनच्या काळात घर बसल्या पाहून त्याचा अभ्यास करतात आमचे व्हिडीओ पाहून इतरही आमचे सहकारी शिक्षक बांधव तेही चांगला प्रयत्न करून शिकतात.

आम्हाला तंत्रस्नेही होण्याची संधी चांगली मिळाली.कोरोना काळात शाळा बंद आहे पण मुलांचे शिक्षण चालू आहे ही संकल्पना आम्ही चांगल्या पद्धतीने राबवत आहोत.

आता सध्या आमच्या या उपक्रमातून प्रत्येक विषयाची तीन ते चार प्रकरण पूर्ण होत आहेत.
आम्ही घर बसल्या शाळा बंद असल्याची उणीव
भरून काढण्याचा मनस्वी प्रयत्न करतोय याचे समाधान शब्दात वर्णन करणे अशक्य आहे यातून या दोन्ही शिक्षकांचे शिक्षणावरील प्रेम आणि आस्था लक्षात येते.

जर जगभरात असेच तंत्रस्नेही शिक्षक तयार झाले तर हा बंद कितीही दिवस राहिला आणि शाळा जरी बंद राहिल्या तरी शिक्षण बंद राहणार नाही हे नक्की….⭕

anews Banner

Leave A Comment