Home परभणी परभणीत बस पुलावरून खाली कोसळली; २५ प्रवासी जखमी

परभणीत बस पुलावरून खाली कोसळली; २५ प्रवासी जखमी

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_123143.jpg

परभणीत बस पुलावरून खाली कोसळली; २५ प्रवासी जखमी

परभणी- (शत्रुघ्न काकडे ब्युरो चीफ)- परभणी जिल्यामध्ये जिंतूर- सोलापूर जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिंतूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं ही बस पुलाच्या खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळच्या सुमारास ही बस सोलापूरकडे निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले होते. त्यावेळी बस अकोली पुलाजवळ आल्यानंतर ही घटना घडली आहे.

या अपघातात ड्रायवर, कंडक्टरसह जवळपास 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिंतूर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळं अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी जमली आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. स्थानिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात येत होतं. बस अचानक पुलाखाली कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Previous articleदेगलूर महाविद्यालयातील चार खेळाडूंचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग.
Next articleउद्धव ठाकरे यांचा हिंगोली जिल्ह्यात कुटुंब संवाद दौरा वसमत सेनगांव कळमनुरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here