Home अमरावती सालबर्डी साठी मंगळवारपासून १०५ लाल परी बस; एस टी महामंडळाची नियोजन, यात्रा...

सालबर्डी साठी मंगळवारपासून १०५ लाल परी बस; एस टी महामंडळाची नियोजन, यात्रा स्पेशल बसेसची सुविधा.

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_082928.jpg

सालबर्डी साठी मंगळवारपासून १०५ लाल परी बस; एस टी महामंडळाची नियोजन, यात्रा स्पेशल बसेसची सुविधा.
दैनिक युवा मराठा.
पी.एन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
महाशिवरात्री निमित्त श्री शेत्र सालबर्डी तसेच श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने तयारी केली आहे.या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील८आगरातुन१०५यात्रा स्पेशल एसटी बसच्या विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सालबर्डी येथे श्री शंभू महादेव यात्रेसाठी ५ते१३ मार्च पर्यंत एसटी बसेस धावणार आहेत. या यात्रेत जिल्हा सह विदर्भ व मध्य प्रदेशातून हजारो भाविक दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दर्शनास येतात. त्यामुळे भाविकांची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस फेऱ्यांची नियोजन केले आहे. अमरावती विभागाद्वारे यात्रा कलावधीत अमरावती, बडनेरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, परतवाडा, मोर्शी, वरुड, तीवसा येथून जादा बस फेऱ्या उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे महिला सन्मान योजना ५० टक्के आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आणि ७५ वर्षावरील नागरिकांना शंभर टक्के सवलत प्रवास उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे महिला सन्मान योजनेत५० टक्के आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आणि ७५ वर्षावरील नागरिकांना शंभर टक्के सवलती प्रवास करण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्याची माहिती अमरावती विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली आहे.

Previous articleवाशीनाका येथील अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक खेळणी वाटप
Next articleशिक्षक बँकेच्या खात्यातून दोन कोटी काढण्याचा प्रयत्न, दोघांना अटक. गार्ड मुळे वाचली रक्कम.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here