Home अमरावती शिक्षक बँकेच्या खात्यातून दोन कोटी काढण्याचा प्रयत्न, दोघांना अटक. गार्ड मुळे वाचली...

शिक्षक बँकेच्या खात्यातून दोन कोटी काढण्याचा प्रयत्न, दोघांना अटक. गार्ड मुळे वाचली रक्कम.

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_083208.jpg

शिक्षक बँकेच्या खात्यातून दोन कोटी काढण्याचा प्रयत्न, दोघांना अटक. गार्ड मुळे वाचली रक्कम.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
पंधरा दिवसांपूर्वी येथील शिक्षक बँकेच्या धनादेशाचा गैरवापर करून दोन अज्ञातांनी एसबीआय मधून तब्बल २ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बँकेने हे रक्कम देण्याची संपूर्ण प्रक्रिया केली, मात्र रक्कम घेऊन जाण्यापूर्वीच गार्ड ला संशय आल्यामुळे त्याने रक्कम घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना ओळखपत्र मागितले असता ते व्यक्ती तेथून पळाले. या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी एक मार्च विक्रांत भूपेंद्र सिंग ठाकूर वय ३१ अमरावती व सुरज अर्जुन सिंग ठाकूर वय ३५ यवतमाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील विक्रांत हा शिक्षक बँकेचा कर्मचारी असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी वाटवण्यासाठी टाकलेल्या धनादेशावर बँकेचे अध्यक्ष, सर व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक व अन्य दोन अशा एकूण पाच जणांच्या स्वाक्षरी होत्या. दरम्यान, पोलिसांनी या स्वाक्षरी खऱ्या की बनावट हे तपासण्यासाठी आता हस्तक्षेत्रज्ञांची मदत घेण्याचे ठरवले आहे. हा चेक गहाळ किंवा चोरी झाला, तू कधी झाला याबाबत पोलीस तक्रार किंवा एसबीआय बँकेला कळले होते का? यासह अन्य काही महत्त्वाची माहिती पत्राद्वारे आम्ही बँकेला विचारले आहे. या प्रकरणात दोघांना अटक केली असल्याचे तपास अधिकारी पीएसआय ढाकुलकर कर यांनी सांगितले
दोन आरोपी बँकेत एक चुकीच घेऊन आले होते. गार्डच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर ते सुटके सोडून पळाले. पोलिसांनी हे सुटके जप्त केली असून त्यामध्ये दोन कोटी होती. एका पोत्यावर यवतमाळ उल्लेख होता. सीसीटीव्ही मध्ये दोन्ही आरोपीची चेहरे दिसत होते. मात्र ते पष्ट नव्हते. त्यामध्ये विक्रांत नव्हता कारण तो रक्कम काढण्यासाठी स्वतः बँकेत गेला नव्हता.

Previous articleसालबर्डी साठी मंगळवारपासून १०५ लाल परी बस; एस टी महामंडळाची नियोजन, यात्रा स्पेशल बसेसची सुविधा.
Next articleअमरावती येथे ट्रक ची दुचाकीला धडक; एक सैनिकीचा मृत्यू तर एक जखमी, राहाटगाव चौक परिसरातील घटना.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here