Home अमरावती अमरावती येथे ट्रक ची दुचाकीला धडक; एक सैनिकीचा मृत्यू तर एक जखमी,...

अमरावती येथे ट्रक ची दुचाकीला धडक; एक सैनिकीचा मृत्यू तर एक जखमी, राहाटगाव चौक परिसरातील घटना.

106

आशाताई बच्छाव

IMG_20240303_083444.jpg

अमरावती येथे ट्रक ची दुचाकीला धडक; एक सैनिकीचा मृत्यू तर एक जखमी, राहाटगाव चौक परिसरातील घटना.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील सैनिकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जखमी झाला. हा अपघात बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास गाडगे नगर ठाण्याच्या हद्दीतील राहाटगाव चौकी परिसरात अमरावती घडला. तसेच जखमेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उच्च सुरू आहे. अविनाश अंबादास उईके वय (२४)या. गणेशपुर, म्रुतक असे मृत्यू सैनिकाचे नाव असुन विशाल सुखाराम तुमडाम (१९)वय ,टेंबुरखेडा, वरुड असे जखमीचे नाव आहे. अविनाश हा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. नुकताच तो सुट्टीवर घरी आला होता. बुधवारी सकाळी अविनाश हा मित्र विशाल याच्यासह दुचाकी क्रमांक एम एच २७डीजी ३४९९ने कामानिमित्त अमरावतीला जात होता. अंतर्गत आडगाव चौक अमरावती परिसरातील हॉटेल जवळ त्याच्या दुचाकी ला एका भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात अविनाशचा जागीच मृत्यू झाला. सर विशाल हा जखमी झाला अपघाताबाबत माहिती मिळतात गाडगे नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व जखमी विशालला तातडी उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मृतदेहाला शिवविच्छादनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात रस्त्याला का विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.