Home अमरावती अमरावती मधून नवनीत रानांच्या हाती कमळ! तर बीड मधून पंकजा मुंडे. दोघींच्या...

अमरावती मधून नवनीत रानांच्या हाती कमळ! तर बीड मधून पंकजा मुंडे. दोघींच्या उमेदवाराबाबत भाजप अंतर्गत खलबत्ते.

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_083720.jpg

अमरावती मधून नवनीत रानांच्या हाती कमळ! तर बीड मधून पंकजा मुंडे. दोघींच्या उमेदवाराबाबत भाजप अंतर्गत खलबत्ते.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
महायुतीमध्ये भाजपाकडे जागा जाईल आणि तिथे सध्याचे खासदार नवनीत कौर राणा उमेदवार असतील असे समजते. तसेच बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची दुसऱ्या पद्धतीने राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे असे समजते.२०१४ची पोटनिवडणूक आणि २०१९ची सार्वत्रिक निवडणूक या दोन्हीमध्ये प्रीतम मुंडे जिंकल्या होत्या. त्यावेळी त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे त्यांच्या विरोधात प्रचाराला उतरले पण यावेळी चित्र वेगळेच दिसून येत आहे. पंकजा यांना उमेदवारी पक्की मध्ये जात असून धनंजय मुंडे हे त्यांच्या प्रचारात दिसतील असे समजते. अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपकडून मिळू शकतात. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अमरावतीच्या मतदारांना हे चिन्ह अंगवळणी पडले आहे. त्यामुळे नवनीत राणा अमृत तिच्या मतदारांना हे चिन्ह मुळे नवनीत राणा यांनी शिवसेने कडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते. तसेच मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांमधील दुरावा कमी झाल्या असल्याचे समजते. मुंडे भगिनीपैकी कोणीही उमेदवार असले तरी आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रावसाहेब धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. पंकजाताई च्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा झाली होती पण तसे झाले नाही. तेव्हा,’पंकजाताई बाबत चांगलेच होईल’असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,माजी प्रदेश अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ,राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची एक समिती भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रासाठी नेमली आहे. संभाव्य उमेदवार निश्चित करण्यास या समितीला सांगण्यात आले आहे. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आणि त्यात संभाव्य नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत असे सुत्र करून समजले. पुनम महाजन यांना उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा संधी द्यायची की पियुष गोयल, आशिष शेलार, अभिनेत्री माधुरी दीक्षित यापैकी एकाला द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. नंदुरबार मधून डॉक्टर हिना गावित यांनाच पुन्हा संधी मिळेल असे म्हटले जाते.

Previous articleअमरावती येथे ट्रक ची दुचाकीला धडक; एक सैनिकीचा मृत्यू तर एक जखमी, राहाटगाव चौक परिसरातील घटना.
Next articleचोपडा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here