Home नाशिक नाशिक जिल्हा पोल्ट्री योद्धा यांनी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा महामेळावा धोडांबे तालुका...

नाशिक जिल्हा पोल्ट्री योद्धा यांनी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा महामेळावा धोडांबे तालुका चांदवड येथील गोरक्षनाथ मंगल कार्यालय संपन्न झाला.

44
0

राजेंद्र पाटील राऊत

स‌ोमपुर प्रतिनिधी. सुभाष अंकुशे

18/04/2022 रोजी नाशिक जिल्हा पोल्ट्री योद्धा यांनी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा महामेळावा धोडांबे तालुका चांदवड येथील गोरक्षनाथ मंगल कार्यालय संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांची पोल्ट्री कंपन्यांकडून गेल्या पंधरा वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य, पोल्ट्री वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संदीप यादव व संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर अध्यक्ष श्री. रुपेश पाटील यांच्यापर्यंत या विषयी चर्चा झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायिकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. याच निमित्ताने धोडांबे येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर धुळे, पुणे, अहमदनगर, रायगड, जिल्ह्यातील पोल्ट्री योद्धा व त्यांच्या संघटनांनी आपापल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येक तालुक्यातील अध्यक्षांनी तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या. महामेळाव्या नंतर नाशिक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. बी. नरवाडे यांना जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या अनेक अडचणी व मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.या मेळाव्या वेळी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य, पोल्ट्री वेल्फेअर चे अध्यक्ष श्री. संदीप यादव, संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर अध्यक्ष श्री. रुपेश पाटील, श्री स्वप्नील यादव, अनील खापकर, विलास साळवी, विनायक वायकर, विलास पवार, रोहिदास गायकर, विक्रम पासलकर, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप देवरे, पोल्ट्री व्यवसायातील तज्ञ व्यावसायिक उपस्थित होते.

Previous articleवाशीम : पिस्तूल चा धक दाखवून लुटमार करणारे तिघे जेरबंद
Next articleकोकणातून जाणाऱ्यांनो जरा थांबा..‌! चिपळूणचा परशुराम घाट २० एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here