Home माझं गाव माझं गा-हाणं मालेगांवात शिरूडे स्ट्ँप्पवेन्डरची मनमानी या काळाबाजाराला लगाम लावायचा कुणी ? बेशिस्त उर्मट...

मालेगांवात शिरूडे स्ट्ँप्पवेन्डरची मनमानी या काळाबाजाराला लगाम लावायचा कुणी ? बेशिस्त उर्मट स्टँम्पवेन्डरवर अधिकारी कारवाई करणार कधी…!!

1185
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांवात शिरूडे स्ट्ँप्पवेन्डरची मनमानी
या काळाबाजाराला लगाम लावायचा कुणी ? बेशिस्त उर्मट स्टँम्पवेन्डरवर अधिकारी कारवाई करणार कधी…!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव-शासनाने विविध कामकाज सुरळीत व सोपे व्हावे म्हणून प्रत्येक तालुक्यात मुद्रांक विक्रेते स्ट्ँपवेन्डर यांच्या नियुक्त्या जिल्हाधिका-यांमार्फत केलेल्या आहेत.
मात्र असे असताना नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहरात असलेल्या राँयल हब या बिल्डिंगमधील मुद्रांक विक्रेता एन.जी.शिरुडे याच्या मनमानीने अक्षरश कळस गाठला असून,ग्राहकांशी उद्दामपणाने वागून उर्मट भाषेत अरेरावी करणे,स्ट्ँम्पपेपर किंवा कोर्ट फी तिकीटे उपलब्ध करुन न देता,”कोठे जायचे तेथे जा,माझे कुणीच काही करु शकत नाही”अशी उर्मटपणाची व अवमानास्पद भाषा वापरुन ग्राहकांनी जर माझ्याकडेच टायपिंगचे कामे केलीत तरच स्ट्ँम्पपेपर मिळेल अशी दमबाजीची भाषा करुन सदर शिरुडे नामक स्ट्ँम्पपेपर विक्रेता स्ट्ँम्पपेपरचा कृत्रिम टंचाई निर्माण करुन स्ट्ँम्पपेपर काळ्या बाजारातही विकत असल्याची वदंता आहे.गत काही दिवसापुर्वीच या शिरुडे नामक विक्रेत्याची चौकशी होऊनही त्यातून नेमके काय निष्पन्न झाले याचा उलगडा मात्र जनतेला झाला नाही.
सदर शिरुडे नामक मुद्रांक विक्रेत्याची कसून चौकशी करण्यात येऊन त्याचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी येत्या शुक्रवारी स्वतः जनहितार्थ “युवा मराठा न्युज चँनल”च्या माध्यमातून नाशिक येथे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेण्यात येऊन लेखी तक्रार सादर केली जाणार आहे.

Previous articleबुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे
Next articleअखेर गजानन साळवे यांनी केंन्द्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार यांना ताहाराबाद आरोग्य केंन्द्रात पहाणीसाठी नेलेच
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here