Home माझं गाव माझं गा-हाणं अखेर गजानन साळवे यांनी केंन्द्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार यांना...

अखेर गजानन साळवे यांनी केंन्द्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार यांना ताहाराबाद आरोग्य केंन्द्रात पहाणीसाठी नेलेच

194
0

राजेंद्र पाटील राऊत

अखेर गजानन साळवे यांनी केंन्द्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार यांना ताहाराबाद आरोग्य केंन्द्रात पहाणीसाठी नेलेच
सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
काल दि १८ आँगस्ट रोजी जन आशिर्वाद यात्रे निमित्ताने ताहाराबाद नगरित केंन्द्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार ११:०० वा येणार होत्या पण सततचा सुरू पाऊस व प्रतेक ठिकाणी होणारे सत्कार ,गाठीभेटीमुळे ताहाराबाद येथे २:०० सुमारास पोहचल्यात ताहाराबाद गावात भाजप पक्षाच्चा वतीने व सुरेश महाजन मित्रमंडळाच्चा वतिने भव्य स्वागत करण्यात आले . सर्व प्रथम मंत्रीमोहदय डॉ. भारतीताईंचे स्वागत आबासाहेब बच्छाव यांच्या निवासस्थानी झाले तेथे पारंपरिक आदिवासी पटका शालींने यथोचित सत्कार करण्यात आला तसेच अन्य कार्यकर्त्यांनी डॉ. ताईचा सत्कार केला . नंतर ढोल ताशांच्या गजरात मंत्र्यांचा ताफा चेयरमन केदा अण्णा जाधव यांच्या निवासस्थानी आला तेथे सन्मानित पदाधिकारी ,संघटना यांनी डॉ. भारतीताई यांचा सत्कार केला . वि. सो. सभागृहात महिला पदाधिकारी यांनी सत्कार केला . आपल्या भाषणात आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी सरकार तर्फे लसिकरणाची माहिती दिली व कोणास काही आरोग्य त्रास होत असेल तर टोलफ्री नं. वर फोन करा अथवा जवळच्चा आरोग्य केंद्रात तपासणी करा . यावेळी ग्रामपंचायती तर्फे सरपंच ,ऊपसरपंच ,सदस्य यांनी नागरी सत्कार केला . तसेच दिपक कांकरीया ,निलेश कांकरीया ग्रामपंचायत सदस्य यांनी ताहाराबाद आरोग्य केंन्द्रातील समस्याचे निवेदन दिले . पुढील पिंम्पळनेर दौर्यावर मंत्री महोदय निघाल्यावर गनिमीकावा पध्दतीने गजानन साळवे ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्चा रस्त्यावर ऊभे झाले व आरोग्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या वहानांचा ताफा अडवुन नम्र निवेदन केले ताई आपणच जर ताहाराबाद आरोग्य केंद्र पाहत नसाल तर कोण पाहिल . डॉ. भारतीताईंनी लगेच आपली गाडी गजानन साळवे यांच्या सांगण्यावरून आरोग्य केंन्द्रात घेतली . अगोदरच आरोग्य कर्मचारी गजानन साळवे हे मंत्री मोहोदयांना आणणार हि कुणकुण होती .सर्वच कर्मचारी डॉक्टर ,आशा वर्कर्स जेवन न करता सत्कारासाठी ऊभेच होते . डॉ. भारतीताईंनी सदर वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली . सध्यस्थितीतील औषध साठा विचारला व नवीन बांधलेल्या ईमारतीसाठी काय काय अडचणी आहेत त्या ऐकुन ,निवेदन घेऊन त्वरित कारवाई (पुढील काम)करण्याचे आदेश दिले .
आज गावासाठी गावातील आरोग्य समस्या मंत्री महोदयांच्या द्रुष्टीपटलावर आणल्या हेच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे .चला येणार्या काळात काय काय होते ते पाहु .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here