Home मुंबई अफगाणी विद्यार्थ्यांची आदित्य ठाकरेंना साद, केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ठाकरेंची ग्वाही 

अफगाणी विद्यार्थ्यांची आदित्य ठाकरेंना साद, केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ठाकरेंची ग्वाही 

138
0

राजेंद्र पाटील राऊत

अफगाणी विद्यार्थ्यांची आदित्य ठाकरेंना साद, केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ठाकरेंची ग्वाही  युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
मुंबई : अफगाणिस्तानात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीमुळे भारतात शिकणारे अफगाण विद्यार्थी भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी आज राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचा आपल्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत नातेवाईकांशी संपर्क करुण देणं आणि महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत आदित्य ठाकरे आणि विद्यार्थ्यांमध्ये आज चर्चा झाली. अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात एकूण 5 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. आम्हाला मदतीची गरज आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता आम्हाला भारताने आश्रय दिला पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच तालिबानने अफगाणीस्तानात प्रवेश केला आहे. आम्ही आदित्य ठाकरे आणि सरकारचे आभारी आहोत. त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला, आमच्या समस्या ऐकल्या. आम्ही सरकारची भेट घेतली कारण आम्ही तालिबानचा विरोध करतो. अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे. महिला सुरक्षित नाहीत. आमचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षा मिळू द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here