Home पुणे शिवाजीराव माने यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार..

शिवाजीराव माने यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार..

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20221024-WA0079.jpg

  • शिवाजीराव माने यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार…..
    सांगवी ,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):- साप्ताहिक पिंपरी चिंचवड पवनेचा प्रवाह व पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पुणे यांच्या रौप्य महोत्सवी दिना निमित्त राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्काराने शिवाजीराव माने यांना पिंपरी चिंचवड मधील प्रसिद्ध उद्योगपती मा. रामदास माने , कामगार नेते मा. नगरसेवक यशवंत भोसले, ह. भ. प. किसन महाराज चौधरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले . पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात आले .महाराष्ट्र राज्यात सामजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करन्यत येते .शिवाजीराव माने हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ठोमसे गावचे रहिवाशी असून सध्या सांगवी पुणे येथील कै .सौ .शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत तसेच सांगवीतील सातारा मित्र मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत .त्यांचे शैक्षणिक काम हे उलेखनिय असून सातारा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सामजिक काम ही मोठे आहे .याबाबत अनेक संस्थांनी त्याना पुरस्कृत केले आहे .त्याना यापूर्वी सन 2015 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरविले आहे . त्यांच्याबरोबर सातारा मित्र मंडळ सांगवी चे खजिनदार सोमनाथ कोरे यांनाही राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.अशा एकुण तीस गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरुड भरारी या पुस्तकाचे व पवनेचा प्रवाह या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास प्रमूख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, पुणे जिल्हा गुणवंत कामगार समिती अध्यक्ष प्रकाश घोरपडे,सातारा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण ,सदस्य विश्वास शिंदे , सविता माने , सर्व पुरस्कारार्थी , गुणवंत कामगार विकास समिती पुणे जिल्हयाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . शिवाजीराव शिर्के चे अध्यक्ष यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले व सुरेश कंक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Previous articleहा खेळ सावल्यांचा नजारा खंडग्रास सूर्यग्रहणाचा
Next articleजिनियस इंग्लिश स्कूलने जपली सामाजिक बांधिलकी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here