• Home
  • संध्याकाळी ९ नंतर फटाके फोडल्यास होणार कारवाई, जिल्हाधिकारी दौलत देसाई

संध्याकाळी ९ नंतर फटाके फोडल्यास होणार कारवाई, जिल्हाधिकारी दौलत देसाई

जिल्ह्यात हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे , जिल्हाधिकारी दौलत देसाई.
दिपावली सणाच्या दरम्यान सायंकाळी सात ते संध्याकाळी नऊ पर्यंतच फटाके फोडण्यात याची परवानगी देण्यात आली आहे. हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करा ,अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.
महानगरपालिका व सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हरीत लवादाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाके वाजवणे किंवा फोडण्यासाठी सायंकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी आहे. इतर वेळी किंवा रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
हरित लवादानुसार शोभेची दारु (फटाका) विक्री व त्याच्या वापराबाबत आदेश दिलेले आहेत.
पुणे, मुंबई , सांगली जिल्ह्या पाठोपाठ आता कोल्हापुरातही हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र अद्यापही तो पूर्णपणे संपला, असे म्हणता येत नाही. तसेच दिवाळीदरम्यान जिल्ह्यातील आणि शहरातील हवा शुद्ध राहावी यासाठीही लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. फटाके फोडण्याची ऐवजी दिवे लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

युवा मराठा न्यूज ब्युरोचिफ कोल्हापूर .

anews Banner

Leave A Comment