• Home
  • डाँ.सायरस पूनावाला’ इंटरनॅशनल स्कूल च्या 23 विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेशपूर्व परीक्षेत नेत्रदीपक यश

डाँ.सायरस पूनावाला’ इंटरनॅशनल स्कूल च्या 23 विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेशपूर्व परीक्षेत नेत्रदीपक यश

पेठ वडगाव :राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी च्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये डॉ.सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत ‘आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिटयूट ‘ च्या 23 विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या प्रवेश पूर्व लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊन भरघोस यश संपादन केले आहे. याबरोबरच पाच विदयार्थी हे तंत्रज्ञान विभागमधील मुलाखतीस पात्र ठरले असून त्याना निवडी बाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिटयूट च्या या भरघोस यशामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिटयूट (AFPI) या विभागामध्ये भावी अधिकारी बनविण्याच्या हेतूने एन.डी.ए. व तत्सम परीक्षांची पूर्व तयारी करून घेतली जाते. ह्या विद्यार्थ्यांचा लेखी, तोंडी व शारीरीक परीक्षेंचा सराव दररोज करून घेतला जातो.ह्या विद्यार्थ्यांना सतत आयोजित केलेल्या साप्ताहिक, मासिक परीक्षा, तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकारी वर्गाची मार्गदर्शन शिबिरे, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन ह्या सारख्या अनेक गोष्टीचा फायदा झाला आहे. लष्करी सेवेतून निवृत्त झालेले अनुभवी अधिकारी ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. ‘पूनावाला’ स्कूलने विद्यार्थ्यांच्यासाठी दिलेल्या भौतिक सुविधा, विविध खेळांची परिपूर्ण मैदाने, सैन्यदलाप्रमाणे विद्यार्थ्यांची दिनचर्या, दर्जात्मक शिक्षण ह्यामुळे या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री.गुलाबराव पोळ(मा. पोलिस आयुक्त ), उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, संस्थेच्या सचिवा व स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ (माजी.नगराध्यक्षा ) यांची प्रेरणा मिळाली तसेच स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्य श्री.मारुती कामत, ए.एफ.पी.आय.चे चेअरमन श्री.विश्वास कदम, ए.एफ.पी.आय. चे संचालक मेजर चंद्रसेन कुलथे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.                                                                                                   मोहन शिंदे ब्युरोचिफ कोल्हापूर ,युवा मराठा न्यूज नेटवर्क.

anews Banner

Leave A Comment