Home नांदेड चाकूचा धाक दाखवून मोटरसायकल चालकास लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

चाकूचा धाक दाखवून मोटरसायकल चालकास लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

94
0

राजेंद्र पाटील राऊत

चाकूचा धाक दाखवून मोटरसायकल चालकास लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील श्यामराव जयवंतराव पाटील यांनी शिरूर रोडवरील बाबू गुट्टे यांच्या शेताजवळ 3 अनोखी आरोपीने सकाळी ९.३० ते १० च्या दरम्यान मोटारसायकल आडवुन चाकुचा धाक दाखवून लूटमार करत खिशातील रेडमी कंपनीचा १२ हजार रुपये किंंमतीचा मोबाईल व पॅन्टच्या खिशातील नदी 2 हजार सातशे रुपये बळजबरीने काढुन घेतल्याच्या श्यामराव जयवंतराव यांच्या फिर्यादीवरून मुखेड पो.स्टे मध्ये कलम ३९२,३४ नुसार दि.०२ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करणात आला होता.या फिर्यादीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन सांंगळे,यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड पो.स्टेशन चे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, पो.उपनिरीक्षक जि.डी काळे,यांनी सायबर सेलच्या मदतीने गुन्हांंचा कसुन चौकशी करून आरोपी वैजेनाथ उर्फ विकाश प्रकाश हंगरगे रा.टाकळी वय वर्षे १९ ता.नायगाव जि.नांदेड,बालाजी संभाजी महाशट्टे वय १९ व प्रकाश उर्फ प्रिन्स नानाराव खवाश वय २५ दोन्ही रा.धनज ता.मुदखेड जि.नांदेड यांना अटक करण्यात आली आसुन आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असुन लुटमारितील रेडमी कंपनिचा मोबाईल नगदी २ हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली टिव्हिएस कंपनिची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपिंंना विश्वासात घेऊन कसुन चौकशी केली आसता आरोपी बालाजी संभाजी महाशट्टे वय १९ वर्षे व प्रिन्स उर्फ प्रकाश नानाराव खवास वय वर्षे २५ या दोन्ही आरोपिंंनी इतर काही ठिकाणी चाकुचा धाक दाखवून लुटमारि केल्याची कबुली दिली आहे.यामध्ये कंधार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कंधार रोडवरील शेल्लाळी शिवारातील महादेव मंदिर जवळील एक्या इसमास आडवुन चाकुचा धाक दाखवुन त्याच्याकडील दागिने,नगदी काही पैसे बळजबरीने काढुन घेेऊन लुटमाारी केल्याची कबुली दिली आहे.सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे,
उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन सांगळे,मुखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, स.पो.नि.भाऊसाहेब मगरे, पो.उप नि.जि.डी काळे,स्थागु शाखेचे पो.उपनिरीक्षक,सचिन सोनवणे,पोलिस आमलदार आत्माराम कामजळगे,सिध्दार्थ वाघमारे,मोहन माडपत्ते,बाबू मुढे,यांच्या पथकाने कार्यवाही केली आसुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here