Home गडचिरोली अल्पवयीन युवतीच्या हत्या प्रकरणी माजी सरपंच रंगा मडावी पोलिसांच्या ताब्यात।

अल्पवयीन युवतीच्या हत्या प्रकरणी माजी सरपंच रंगा मडावी पोलिसांच्या ताब्यात।

38
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220407-WA0065.jpg

अल्पवयीन युवतीच्या हत्या प्रकरणी माजी सरपंच रंगा मडावी पोलिसांच्या ताब्यात।
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- मागील सात दिवसांपासुन घरातुन गायब असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचा मृतदेह शेत परिसरात पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना भामरागड तालुक्यातील गेर्रा येथे उघडकिस आला आहे.मिना येरा सिडाम रा.मन्नेजाराम ता.भामरागड असे मृत अवस्थेत आढळून आलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.या घटनेने भामरागडसह जिल्हाभरात खडबड उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार,मागील आठवळ्यातील मंगळवारी मिना आपल्या घरातुन अचानक निघुन गेली होती.ती परत न आल्याने कुंटुबियासह नातेवाइकांनी शोधमोहिम राबविली.माञ मिनाचा थांगपत्ता लागलाच नाही.माञ यासंदर्भात कुंटुबियानी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारच दिली नसल्याचे माहीती आहे.दरम्यान दोन दिवसा पुर्वी सोमवारी गेर्रा गावाजवळ असलेल्या शेत परिसरात मिनाचे शव जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आले.घटनेची माहीती प्राप्त होताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असुन प्रकरणाचा पुढील तपास जिमलगट्टा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात सुरु आहे.
302 अन्वये गुन्हा दाखल
दोन दिवसा पुर्वी गेर्रा गावाजवळील शेतशीवारात अल्पवयीन मुलिचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली.माहीतीच्या आधारे घटनास्थळ गाठुन मृतदेह बाहेर काढण्यात आले.पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहे.अध्याप शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.या घटने संदभात 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस गांभीर्याने करीत आहेत.
क्षिरसागर,पोलिस अधिकारी,जिमलगट्टा उपविभाग

माजी संरपंचाला घेतले ताब्यात,

अल्पवयीन युवतीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरल्याप्रकरणी पोलिसांनी मन्नेराजाराम येथिल माजी सरपंच रंगा मडावी याला चौकशीसाठी मंगळवार ला ताब्यात घेतले आहे.रंगा मडावी यांचा मुलगा अविनाश रंगा मडावी हा फरार असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.अविनाशच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रेम प्रकरणातुन हत्या झाल्याची चर्चा ?
मृतक अल्पवयीन युवतीचे अविनाश नावाच्या युवकासोबत प्रेम संबध सुरु होते.त्यामुळेच ती घरातुन निघुन गेली.काही दिवस लोटुनही ती घरात परत आली नाही.दरम्यान दोन दिवसी पुर्वी त्या अल्पवयीन युवतीचा मृतदेह गेर्रा गावातील शेतशीवारात जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळुन आला.तिची हत्या प्रेम प्रकरणातुन झाल्याची चर्चा भामरागड तालुक्यात सुरु आहे.पोलिसांनी प्रेम प्रकरणाला दुजोरा दिला असुन हत्येचे नेमके कारण कोणते,हत्या कोणी केली,हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Previous articleवरवट बकाल येथे श्रीशिवशंकर पतसंस्थेच्या पाणपोईचे उदघाटन
Next article“अवैध वृक्षतोड प्रकरणी स्वाभिमानी चा तहसील वर आक्रमक पवित्रा”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here