Home बुलढाणा “अवैध वृक्षतोड प्रकरणी स्वाभिमानी चा तहसील वर आक्रमक पवित्रा”

“अवैध वृक्षतोड प्रकरणी स्वाभिमानी चा तहसील वर आक्रमक पवित्रा”

38
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220408-WA0001.jpg

“अवैध वृक्षतोड प्रकरणी स्वाभिमानी चा तहसील वर आक्रमक पवित्रा”

संग्रामपूर मधील एकलारा गावात अवैध वृक्षतोड प्रकरणी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांचा तहसील कार्यालयात आक्रमक .
संग्रामपूर/रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क तालुक्यातील एकलारा बानोदा येथिल शासकीय ई क्लास जमिनीवरील ७० वर्षापुर्वी‌चे असलेल्या १० पेक्षा जास्त लिंबाच्या झाडाची दि.५ एप्रिल रोजी अवैध पणे कत्तल केली आहे. त्या लिंबाच्या वृक्षांची तस्करी करणाऱ्यावर कारवाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कार्यकर्त्यांसह तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या वृक्षतोड प्रकरणी एकलारा बानोदा शिवाराचे तलाठी देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे यांनी तामगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात विरुद्ध कलम ३७९ चा गुन्हा दाखल केला आहे. पंरतु प्रशासन प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळताच प्रशांत डिक्कर यांनी तहसीलदार समोर ठाण मांडून बसले होते. वृक्षतोड करणारे कोण याचा तत्काळ शोध घेऊन कारवाई करा अशी मागणी लावून धरली. अखेर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर या प्रकरणा बाबत ग्रामस्थांकडून प्राप्त तक्रार नुसार प्रकरणाचे सर्व गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र विभाग जळगाव जामोद कार्यक्षेत्रात असलेल्या वनरक्षक देवकर व वनपाल दंडे यांचे वृक्षतोड करणारे व्यापाऱ्या सोबत मिलीभगत असल्याचे कळले आहे. त्यादृष्टीने यांचा जलद गतीने तपास करुन कारवाई करण्यासाठी पोलिस निरीक्षक यांना तहसिलदार यांनी सहिनिशी पत्र देण्यात आले. जो पर्यंत या अवैध वृक्षतोड करणारे, व संबंधित लाकुड व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना लढत राहणार असल्याचा इशारा प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी गावातील नागरिक गणेश हागे ,विजय ताडे ,सुनिल अस्वार ,भिकाजी वानखडे ,महादेव गाडगे ,भास्कर धुळे ,नामदेव हागे ,रुपेश अस्वार ,महादेव अस्वार , प्रविण येणकर, आशिष नांदोकार ,शिवा पवार ,विवेक राऊत सह बहुसंख्य शेतकरी वर्ग तसेच आदी गावकरी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here